---Advertisement---

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही स्टोक्स; जाणून घ्या कारण…

On: रविवार, ऑगस्ट 9, 2020 7:32 PM
---Advertisement---

इंग्लंड संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सच्या कौटुंबिक कारणामुळे पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेत इंग्लंड संघाला त्याची उणीव भासणार आहे. स्टोक्स न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या आपल्या कुटुंबाकडे जाण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध साऊथँम्पटन येथे प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या २ कसोटी सामन्यात खेळताना दिसणार नाही.

इंग्लंडच्या हिवाळी दौर्‍यादरम्यान दक्षिण आफ्रिकेविरूद्ध बॉक्सिंग डे कसोटीच्या काही दिवस आधी स्टोक्सचे वडील गेड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यानंतर तो न्यूझीलंडमध्ये आपल्या घरी परतला होता.

इंग्लंडचा कसोटी उप-कर्णधार स्टोक्सने आतापर्यंत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुरुवातीच्या कसोटीत जो रूटच्या अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्व केले. दुसर्‍या सामन्यात त्याने शतक आणि अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर त्याने फलंदाजीव्यतिरिक्त नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये ११ विकेट्सही घेतल्या आहेत.

स्टोक्सने आतापर्यंत ६७ कसोटी सामने, ९५ वनडे सामने आणि २६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ४४२८ धावा आणि १५८ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने २६८२ धावा आणि ७० विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२०त त्याने ३०५ धावा आणि १४ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-रिषभ पंतने ‘या’ दिग्गजाचा ऑटोग्राफ घेतलेला फोटो केला शेअर, सोबत लिहिला भावनिक मेसेज

-या दिग्गजाचा गजब खुलासा, ‘दुखापतीमुळे केला होता ३८० धावांचा विश्वविक्रम’

-संघसहकाऱ्याच्या ‘त्या’ कृत्यामुळे संपले ‘या’ दिग्गज खेळाडूचे करिअर; कसोटीच्या एका डावात घेतल्या होत्या ९ विकेट्स

ट्रेंडिंग लेख-

-एकाच वनडेत ५० पेक्षा अधिक धावा करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ४ भारतीय क्रिकेटर

-वाढदिवस विशेष: वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा हॅमिल्टन मासाकात्झा

-हे ५ दिग्गज कदाचित कधीच नाही खेळू शकणार आयपीएल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---