रविवारी (१८ एप्रिल ) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात अटीतटीचा सामना पहायला मिळाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. परंतु सामना सुरू असताना समालोचन करताना केलेल्या एका चुकीमुळे सुनील गावसकर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून समालोचक म्हणून कार्यरत आहेत.सामना सुरू असताना सतत बोलत राहणे सोपे काम नसते. कधी कधी शब्द इकडे तिकडे होऊन जातात, असाच काहीसा प्रकार सुनील गावस्कर यांच्यासोबत घडला आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू असताना समालोचन करताना सुनील गावसकर यांच्याकडून चूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर झाले असे की, पंजाब किंग्ज संघाची फलंदाजी सुरू होती आणि केएल राहुल आणि मयंक अगरवाल फलंदाजी करत होते. तेव्हा दिल्लीकडून ११ वे षटक टाकण्यासाठी कगिसो रबाडा आला.
मयंक अगरवालने या षटकात २ षटकार लगावले होते. त्यानंतर केएल राहुल स्ट्राईकवर आला आणि त्याने देखील बाडाने टाकलेल्या बाऊन्सर चेंडूवर षटकार लगावला होता. या षटकारावर, समालोचन करत असलेल्या सुनील गावसकर यांनी म्हटले की, “हा खूपच खराब बाऊन्सर होता. तुम्हाला जर बाऊन्सर चेंडू टाकायचा असेल तर तो ऑफ स्टंपच्या बाहेर टाकायला हवं.” रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर स्पष्ट दिसून येत होते की, तो बाऊन्सर ऑफ स्टंपच्या बाहेरच होता.
यानंतर राजस्थान रॉयल्स संघातून निरोप घेतलेला इंग्लिश अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने ट्विट करत सुनील गावसकर यांना त्यांचे नाव न घेता त्यांना ट्रोल केले आहे. त्याने गावसकरांनी समालोचन करताना बोललेले वाक्य ट्विटमध्ये लिहिले आहे. तसेच रिप्लेमध्ये बाऊन्सर ऑफ स्टंपच्या बाहेर असल्याचे दिसत आहे असेही त्याने लिहिले आहे. याबरोबरच त्याने डोक्यावर हात मारायचा ईमोजीही या ट्विटमध्ये टाकला आहे.
Commentator: “Such a poor bouncer,if you want to bowl a bouncer it must be over Off Stump”
REPLAY: bouncer line directly over Off Stump
Me: 🤦♂️🤦♂️🤦♂️
— Ben Stokes (@benstokes38) April 18, 2021
बेन स्टोक्स सध्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याला राजस्थानकडून पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात खेळताना ख्रिस गेलचा झेल घेण्याता हाताच्या बोटाला दुखापत झाली. ज्यावर शस्त्रक्रिया करावी लागली असून तो आता जवळपास ३ महिन्यांसाठी क्रिकेटमधून दूर गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हैद्राबादच्या अपयशाचे लक्ष्मणने सांगितले कारण, ‘यांना’ धरले जबाबदार
पदार्पणाच्या सामन्यात हॅट्रिकसह ९ बळी घेत ‘या’ गोलंदाजाने घडविला इतिहास
CSK vs RR : राजस्थानचा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय; असे आहेत ११ जणांचे संघ