आयर्लंड आणि भारत यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. यशस्वी जयस्वाल व तिलक वर्मा हे दोन्ही युवा फलंदाज बाद झाल्यानंतर उपकर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी डाव सावरला. संजू आक्रमक फटकेबाजी करत भारतीय संघाचा डाव पुढे नेत असताना, आयर्लंडचा फिरकीपटू बेन व्हाईट याने त्याला बाद केले. यासोबतच मालिका सुरू होण्यापूर्वी व्हाईट याने दिलेला शब्द देखील पूर्ण केला.
भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे संधी मिळाल्यानंतर यशस्वी जयस्वाल 18 व तिलक वर्मा 1 धाव करून बाद झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसन याने सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारत आयर्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. आयर्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल याच्यावर त्यांनी विशेष हल्ला चढवत एकाच षटकात सलग तीन चौकार व एक षटकार लगावला. संजू वेगाने आपल्या अर्धशतकाकडे जात असताना, लेगस्पिनर बेन व्हाईट याने त्याचा त्रिफळा उडवला. त्याने 26 चेंडूंवर पाच चौकार व एका षटकाराच्या मदतीने 40 धावा केल्या.
A wicket for Ben White as he bowls Samson for 40 👏
India 105-3 (12.2)#IREvIND🏏☘ #BackingGreen #IrishCricket pic.twitter.com/1ejkEwMkTK
— Cricket Ireland (@cricketireland) August 20, 2023
ही मालिका सुरू होण्यापूर्वी व्हाईट याने संजूला बाद करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला होता,
“या संघात अनेक उत्कृष्ट फलंदाज आहेत. मात्र, संजू सॅमसन एक अनुभवी खेळाडू असून, त्याला मागील अनेक वर्षांपासून आपण पाहत आहोत. त्याला बाद करण्याची संधी मिळाल्यास नक्कीच आनंद होईल.”
व्हाईट हा आयर्लंडचा प्रमुख फिरकीपटू असून त्याने आतापर्यंत 20 टी20 सामन्यांमध्ये 20 बळी मिळवले आहेत.
(Ben White Took Sanju Samson Wicket In 2nd Wicket)
महत्वाच्या बातम्या –
क्लास इज पर्मनंट! 47 व्या वर्षी कॅलिसची झंझावाती फलंदाजी, चौकार-षटकारांचा पाडला पाऊस
दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक आयर्लंडच्या पारड्यात, भारता ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह करणार प्रथम…