---Advertisement---

Video: मुलाला कोरोना टेस्ट करण्यासाठी झाली मारहाण? हरभजनने व्यक्त केला संताप

On: मंगळवार, मे 25, 2021 12:55 AM
---Advertisement---

मागील काही काळापासून कोरोना वायरसबद्दलचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता असाच एक संतापजनक व्हिडिओ भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगनेही शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दोन लोक एका मुलाला मारहाण करीत आहेत. या व्हिडिओबद्दल हरभजनने आपला संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओद्वारे असा दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ बेंगळुरूचा असून ज्यामध्ये एका मुलाला कोरोना चाचणी करण्याची सक्ती करत त्याला मारहाण केली जात आहे. मुलगा नकार देत असल्यामुळे दोन व्यक्तींनी त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. काहींनी मध्यस्थी केली पण मुलाला मारहाण थांबली नाही. तथापि, या व्हिडिओची सत्यता अजून शोधली गेलेली नाही.

शिल्पा नावाच्या एका ट्विटर अकाउंटद्वारे हा व्हिडिओ शेयर करत लिहिले गेले आहे की, कोरोनाची चाचणी करण्याची बंगळुरुमधील शैली.”

हे ट्विट हरभजनने रिट्वीट केले आणि लिहिले की, “किती लज्जास्पद बाब आहे. या मुलाला चाचणीसाठी का मारहाण केली जाते? अशाप्रकारे आपण कोरोना विषाणूंविरूद्धचे युद्ध जिंकू? हे खूप चुकीचे आहे.”

असाच एक व्हिडिओ मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये छत्तीसगडमधील डीएमने एका मुलाला चापट मारली होती. तो व्हिडीओ वायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघल यांनी कारवाई करत, सूरजपूरचे डीएम रणवीर शर्मा यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले होते. दरम्यान हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की या व्हिडिओ बद्दल आगामी काळात काय घडामोडी घडतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहित आणि विराट यांच्यासोबत चर्चा करताना मिळतात ‘हे’ सल्ले, शुभमन गिलचा खुलासा

त्यावेळी पत्नीला प्रेक्षकांच्या भीतीने जावे लागले होते स्टेडियममधून बाहेर, मुरली कार्तिकने सांगितली जुनी आठवण

बीसीसीआयची पुन्हा नाचक्की! १० वर्षांपूर्वी आयपीएल खेळलेल्या खेळाडूला मिळाले नाहीत पैसे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---