---Advertisement---

फलंदाजीत सुपरफ्लॉप ठरलेले एक असे क्रिकेटपटू, ज्यांच्या बायकोलाही नव्हता त्यांच्या खेळीवर विश्वास!

On: बुधवार, एप्रिल 7, 2021 8:18 PM
---Advertisement---

क्रिकेटविश्वात अनेक खेळाडू होऊन गेले ज्यांनी आपल्या खेळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. परंतु काही खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. असेच एक क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली; परंतु फलंदाजीमध्ये त्यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. आज (०७ एप्रिल) त्यांची जयंती आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा खेळाडू बर्ट आयरनमोंगर यांचा जन्म ७ एप्रिल १८८२ मध्ये क्वींसलैंडमधील पाइन माउंटेनमध्ये झाला होता. ‘डेंटी’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेटपटूंनी कमी वेळातच आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवला होता. १९२८ पासून १९३३ पर्यंत त्यांनी १४ कसोटी सामने खेळले होते. या सामन्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. परंतु त्यांना फलंदाजीमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते.

त्यांनी ऑस्ट्रेलियन संघासाठी १४ कसोटी सामने खेळले होते. यात त्याने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध सामने खेळले होते. यात त्यांनी ७४ गडी बाद केले होते. यासोबतच त्यांनी २४ धावा देत ११ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता.

गोलंदाजीमध्ये विक्रमांचा पाऊस पाडणाऱ्या बर्ट आयरनमोंगर यांच्या पदरी फलंदाजीमध्ये निराशाच हाती लागली. त्यांनी १४ कसोटी सामन्यांच्या २१ डावात अवघ्या ४२ धावा केल्या होत्या. यासोबतच तो ५ डावात नाबाद राहिले होते.

बर्ट आयरनमोंगर यांच्या कारकिर्दीत एक गोष्ट प्रचंड चर्चेची ठरली होती. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सामना सुरू असताना जेव्हा बर्ट आयरनमोंगर फलंदाजी करण्यासाठी गेले होते, तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये बर्ट आयरनमोंगर यांच्या पत्नीचा फोन आला होता. तेव्हा त्यांच्या पत्नीला सांगण्यात आले की, “ते आताच फलंदाजी करण्यासाठी गेले आहेत.” तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “ठीक आहे मी होल्ड करते फोन” यावरून असे दिसून आले होते की, त्यांच्या पत्नीलाही माहित होते की, आयरनमोंगर जास्त वेळ फलंदाजी करू शकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

“एक दिवस तस्लीमा नसरीन मला प्रत्यक्षात भेटली तर…,” मोईन अलीच्या वडिलांची जबरदस्त फटकार

वयाची तिशी पार केलेल्या ‘या’ अष्टपैलूला करायचंय टीम इंडियात पुनरागमन, आकडेवारी राहिलीय कौतुकास्पद

‘किंग खान’च्या केकेआरची नजर तिसऱ्या विजेतेपदावर; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होणार लढत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---