२० वर्षांपूर्वी क्रिकेट इतिहासात आश्चर्यकारक घटना घडली होती. न्यूझीलंडमध्ये एका प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात एका गोलंदाजाने एकाच षटकात तब्बल ७७ धावा दिल्या होत्या.
त्यावेळी झाले असे की शेली ट्रॉफी स्पर्धेत विलिंग्टन विरुद्ध कँटरबरी असा सामना सुरु होता आणि कँटरबरीला जिंकण्यासाठी २ षटकात ९५ धावांची आवश्यकता होती. यावेळी बर्ट व्हान्स हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला आणि त्याने तब्बल एका षटकात २२ चेंडू टाकले. त्यातील १७ चेंडू तर त्याने नो बॉलच टाकले होते.
विशेष म्हणजे सामना पंचांचा गोंधळ झाल्याने त्यांनी ५ व्या वैध चेंडुवरच ते षटक संपल्याचा इशारा केला. या षटकात कँटरबरीच्या फलंदाजांनी तब्बल ७७ धावा केल्या. यातील ७० धावा तर एकट्या ली जर्मन या फलंदाजाने तर ५ धावा फोर्ड या फलंदाजाने केल्या. What are the most runs scored in one over in cricket?
त्याचबरोबर प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात एकदा विंडीजचे गॅरी सोबर्स यांनी माल्कम नॅशच्या गोलंदाजीवर तर भारताकडून रवी शास्त्रींनीं टिळक राजच्या गोलंदाजीवर सलग सहा षटकार मारून एका षटकात ३६ धावा करण्याचा विक्रम केला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
षटकार- चौकार मारले म्हणून एमएस धोनी झाला होता नाराज
भारतीय खेळाडू देशासाठी नाही तर स्वत: साठी खेळतात
टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा