आपल्यासाठी 2023 वर्ष अनेक कारणांमुळे खास ठरले. क्रिकेट हेदेखील त्यातील एक महत्वाचे कारण आहे. आशिया चषक आणि आयसीसी वनडे विश्वचषकासह इंडियन प्रीमियर लीगमुळे चाहत्यांच्या मनोरंजनात कमी कुठेच पडली नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. वनडे क्रिकेटमध्ये यावर्षी भारतीय गोलंदाजांचा दबदबा राहिला. आपण या लेखात 2023 मध्ये सर्वाधिक वनडे विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांवर नजर टाकणार आहोत.
5. शाहीन शाह अफ्रिदी –
पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी वर्षीत पाचवा सर्वाधिक वनडे विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. आफ्रिदीने 2023 मध्ये खेळलेल्या 21 सामन्यांमध्ये 42 विकेट्स घेतल्या. 54 धावा खर्च करून 5 विकेट्स हे त्याचे 2023मधील सर्वोत्तम प्रदर्शन ठरले.
4. संदीप लमिछाने –
नेपाळ संघाचा माजी कर्णधार आणि फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने याने 2023 मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. संदीने 21 वनडे सामन्यांमध्ये 43 विकेट्स घेतल्या. तो वर्षात सर्वाधिक वनडे विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. 25 धावा खर्च करून 5 विकेट्स हे त्याचे वर्षातील सर्वोत्तम प्रदर्शन राहिले.
3. मोहम्मद शमी –
वनडे विश्वचषक 2023 मध्ये मोहम्मद शमी भारताचा सर्वात महत्वाचा गोलंदाज ठरला. त्याने विश्वचषक स्पर्धेत आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सर्वाचे लक्ष वेधले. 2023 मध्ये शमी एकूण 19 वनडे सामने खेळला ज्यामध्ये 16.46च्या सरासरीने 43 विकेट्स घेतल्या. 57 धावा खर्च करून 7 विकेट्स, हे शमीचे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले. विश्वचषक स्पर्धेत शमी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
2. मोहम्मद सिराज –
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्यासाही 2023 वर्ष खास ठरले. त्याने वर्षात एकूण 25 वनडे सामने खेळले आणि 44 विकेट्स नावावर केल्या. मोहम्मद सिराजचे सर्वोत्तम प्रदर्शन 21 धावा खर्च करून 6 विकेट्स असे होते.
1. कुलदीप यादव –
वनडे क्रिकेटमध्ये कुलदीप यादव 2023 मध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. कुलदीपने यावर्षी खेळलेल्या 30 वनडे सामन्यांमध्ये सर्वात जास्त 49 विकेट्स घेतल्या. त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन 25 धावा खर्च करून 5 विकेट्स राहिले. (Bowlers with Most ODI Wickets in 2023)
महत्वाच्या बातम्या –
आकाश चोप्राने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’, ‘या’ चार भारतीयांना दिलं स्थान
‘डेव्हिड वॉर्नर फक्त वीरेंद्र सेहवागच्या मागे’, भारताच्या माजी प्रशिक्षकाचं धक्कादायक विधान