भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मंगळवार, 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात भेदक गोलंदाजी करत पाहुण्या आफ्रिकी संघाला स्वस्तात गुंडाळले. खासकरून फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे प्रदर्शन सर्वोत्तम राहिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या भारतीय गोलंदाजाने केलेले हे तिसरे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांचा विचार केला, तर पहिल्या क्रमांकावर सुनील जोशी (Sunil Joshi) यांचे नाव येते. जोशींना अवघ्या 6 धावा खर्च करून आफ्रिकी संघाच्या पाच विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आहे. चहलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका वनडे सामन्यात 22 धावा खर्च करून 5 विकेट्स मिळवल्या होत्या. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) मंगळवारच्या प्रदर्शनानंतर यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कुलदीपने या सामन्यात 18 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. चौथ्या क्रमांकावर देखील पुन्हा एकदा कुलदीप यादवचेच नाव आहे. या सामन्यात कुलदीपने 23 धावा देत चार विकेट्स घेतल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणारे भारतीय गोलंदाज
5/6 – सुनील जोशी
5/22 – युझवेंद्र चहल
4/18 – कुलदीप यादव*
4/23 – कुलदीप यादव
दरम्यान कुलदीप आणि त्याच्या साधीने संघातील इतर गोलंदाजांनी मंगळवारी ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, त्यामुळे आफ्रिकी संघ 100 धावांचा टप्पाही पार करू शकला नाही. पाहुणा दक्षिण आफ्रिका संघ भारताविरुद्धच्या या तिसऱ्या वनडे सामन्यात 27.1 षटकात 99 धावा करून सर्वबाद झाला. ही भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी आजपर्यंत केलेली सर्वात कमी धावसंख्या आहे.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने केलेल्या सर्वात कमी धावसंख्या
99 – दिल्ली, 2022
117 – नायरोबी, 1999
118 – सेंच्युरियन, 2018
दरम्यान, उभय संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या मंगळवारच्या सामन्याचा एंकदरीत विचार केला, तर भारतासाठी कुलदीपनंतर वॉशिंगटन सुंदर (15/2), मोहम्मद सिराज (17/2) आणि शाहबाज अहमद (32/2) यांनी सर्वोत्तम गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. त्यांचा दुसरा एकही फलंदाज 15 धावांचा टप्पा पार करू शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दिल्लीत कुलदीप ‘बादशाह’! अवघ्या 4 षटकात केला दक्षिण आफ्रिकेचा खेळ खल्लास; पाहा व्हिडिओ
सिराज-सुंदरनंतर कुलदीप शो! यादवसाठी दुसऱ्या क्रमांकाचा ‘वनडे स्पेशल’ संघ दक्षिण आफ्रिका, पहिल्या…