आयपीएल २०२० चा अंतिम सामना मंगळवारी(१० नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५ विकेट्सने जिंकून इतिहास रचला. या सामन्याबरोबरच आयपीएल २०२० चा हंगामाही संपला. या हंगामाने चाहत्यांना अनेक अविस्मरणीय क्षण दिले. काही अश घटना होत्या. ज्यांनी चाहत्यांची मने जिंकली. अशाच ५ घटनांबद्दल या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
१. जडेजा-शिखरचे मित्र प्रेम – इंडियन प्रीमियर लीगच्या ३४वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. या सामन्यात ३ जीवनदानांचा फायदा घेत दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने आयपीएलमधील आपले पहिले शतक केले. यादरम्यान जडेजाच्या एका षटकात धवनने एकापाठोपाठ सलग २ चौकार लगावले. त्यानंतर जडेजाने मस्तीमध्ये जाऊन धवनची गळाभेट घेतली. इंडियन प्रीमियर लीगने ट्विटरवर जडेजा आणि धवनचा गळाभेट घेतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.
https://twitter.com/IPL/status/1317506331780132864
२. ख्रिस गेल आणि जोफ्रा आर्चरची खिलाडूवृत्ती –
अबु धाबीच्या मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झालेल्या आयपीएल सामन्याततर आर्चरने सर्वांचे मन जिंकणारे एक कृत्य केले. या सामन्यात राजस्थानचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने पंजाबच्या ख्रिस गेलचा ९९ धावांवर त्रिफळा उडवला. पण त्यानंतर त्याने गेल मैदानाबाहेर पडण्यापूर्वी त्याच्याशी हस्तांदोलन केले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने सामन्यानंतर ट्विटरवर गेलची प्रशंसा करणारे ट्विटही केले. त्याने दोघांचा हात मिळवतानाचा फोटो शेअर केला आणि ‘आताही तो बॉसच आहे,’ असे कॅप्शन दिले.
https://twitter.com/JofraArcher/status/1322249742005383168
३. अश्विनने बांधली गेलची शूलेस –
दुबई येथे झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यादरम्यान दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने पंजाबच्या विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या शूजचे लेस बांधले होते. विशेष म्हणजे त्यानंतर अश्विनने गेलचा त्रिफळा उडवला होता आणि त्याला बाद केले होते. या सामन्यानंतर अश्विनने याविषयी अतिशय मजेदार ट्विट केले. ट्विटमध्ये अश्विनने गेलच्या शूजचे लेस बांधतानाचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “डेविल (राक्षस किंवा दृष्ट मनुष्य) नेहमी डिटेलमध्ये असतो. ‘गेलला गोलंदाजी करण्यापुर्वी त्याच्या शूजचे लेस नाही तर, त्याचे दोन्ही पाय बांधा.’
https://twitter.com/ashwinravi99/status/1318789400306864128
४. पंतने केली रिकी पाँटिंगची नक्कल –
१७ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने आले होते. सामन्यादरम्यान दिल्ली संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग समालोचकांना मुलाखत देत असताना, रिषभ पंतने त्यांची नक्कल केली.
https://twitter.com/Kourageous__/status/1317505469238358016
यावेळी त्याला दिल्लीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मार्कस स्टॉयनिसनेही यात साथ दिली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.






