न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा सध्या सुरू असून गुरुवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. न्यूझीलंडने भारताविरुद्ध अनेक कसोटी मालिका भारतीय भूमीवर खेळल्या आहेत. आता पुन्हा एकदा न्यूझीलंड संघ भारतीय संघाविरुद्ध भारतातच कसोटी मालिकेत उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यापूर्वी दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेत भारताने न्यूझीलंडवर 3-0 असा क्लीन स्वीप केला होता.
भारतात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडला फारसे यश मिळाले नाहीय. भारतात दोन्ही संघांमध्ये 34 कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडने केवळ 2 सामने जिंकले आहेत आणि भारताने 16 सामने जिंकले आहेत. पण तरीही काही न्यूझीलंडच्या खेळाडूंनी फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. ज्यात केन विलियम्सन, रॉस टेलर, स्टीफन फ्लेमिंग आणि जॉन राईट यांसारख्या फलंदाजांनी आपली चमक दाखवली आहे. या लेखामध्ये, आज आम्ही त्या 3 सर्वोत्तम कसोटी डावांचा उल्लेख करणार आहोत.
3. बर्ट सटक्लिफ – 151*, कोलकाता (1965)
भारतात आतापर्यंत न्यूझीलंडसाठी एकाहून एक शानदार खेळी खेळल्या गेल्या आहेत. पण कसोटी क्रिकेटमध्ये बर्ट सटकलिपने १९६५ साली खेळलेली खेळी कोणीही विसरू शकत नाही. बर्ट सटक्लिफने 1965 च्या कसोटी मालिकेत कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रतिकूल परिस्थितीत 151 धावांची नाबाद खेळी खेळली होती. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सटक्लिफने टेलरसोबत महत्त्वाची भागीदारी केली. या दोघांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात 9 बाद 462 धावा केल्या होत्या.
2. ब्रेंडन मॅक्युलम – 225, हैदराबाद (2010)
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने भारताविरुद्ध अनेक जबरदस्त खेळी खेळल्या आहेत. मॅक्युलमने 2014 मध्ये न्यूझीलंडमध्ये भारताविरुद्ध 302 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली होती. पण भारताच्या भूमीवर मॅक्युलमने 2010 साली हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अप्रतिम फलंदाजी करत 225 धावा केल्या होत्या. या सामन्यात मॅक्युलमने 308 चेंडूत 225 धावांची शानदार खेळी केली होती. मॅक्युलमच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताला आघाडी असूनही विजय मिळवता आला नाही.
1. अँड्र्यू जोन्स – 78, मुंबई (1988)
साल 1988 च्या मुंबई कसोटीत न्यूझीलंडचा माजी खेळाडू अँड्र्यू जोन्सने खेळलेल्या खेळीला अव्वल दर्जाचे स्थान मिळाले आहे. या 78 धावांच्या खेळीचेही विशेष महत्त्व आहे. 1988 मध्ये न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज जोन्सने अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी 78 धावा केल्या होत्या. या सामन्यात न्यूझीलंडकडे पहिल्या डावाच्या आधारे केवळ 2 धावांची आघाडी होती. त्यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडने पहिली विकेट 2 धावांत गमावली.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना जोन्सने जबरदस्त खेळी करत संघाची धावसंख्या 279 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जोन्सने 78 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. यानंतर भारतासमोर आघाडीसह 282 धावांचे लक्ष्य होते आणि न्यूझीलंड संघाने भारताचा डाव 145 धावांवर संपवत 136 धावांनी कसोटी सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
दुर्दैवच अजून काय! रणजी ट्रॉफीचे ३ दिग्गज कर्णधार, ज्यांना मिळाली नाही टीम इंडियाकडून खेळण्याची संधी
रहाणेकडे धोनीला, तर अश्विनकडे हरभजनला मागे टाकण्याची संधी; कानपूर कसोटीत तुटणार अनेक विक्रम
क्रिकेटच सर्वस्व! लग्नानंतर २ दिवसातच उन्मुक्त चंद मेलबर्नला रवाना, बीबीएलमध्ये दिसणार खेळताना