आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांनी मेलबर्नला रवाना झाला. उन्मुक्त आणि सिमरन खोसला यांनी २१ नोव्हेंबर रोजी लग्न केले. त्यानंतर उन्मुक्त बिग बॅश लीगमध्ये भाग घेण्यासाठी २३ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. उन्मुक्त लग्नासाठी अवघ्या दोन दिवसांसाठी भारतात आला होता. भारतीय संघामध्ये स्थान न मिळाल्याने उन्मुक्तने निवृत्तीची घोषणा केली होती आणि त्यानंतर तो अमेरिकेला गेला होता. उन्मुक्त आता अमेरिकेत क्रिकेट खेळत आहे.
उन्मुक्त आता अमेरिकेत क्रिकेट खेळत असून बीसीसीआयपासून वेगळे झाल्यामुळे त्याला बीबीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. बीसीसीआय आपल्या खेळाडूंना आयपीएल व्यतिरिक्त जगातील कोणत्याही फ्रँचायझी लीगमध्ये खेळू देत नाही. यामुळेच त्याने भारतातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
उन्मुक्त आणि सिमरन या दोघांनी दोनच दिवसात लग्न केले आणि त्यानंतर तो बीबीएलमध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. उन्मुक्त ऑस्ट्रेलियाला एकटाच गेला आहे. उन्मुक्त बीबीएलमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळणार आहे. २८ वर्षीय उन्मुक्त हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे, जो बीबीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू महिला बिग बॅश लीगमध्ये सहभागी होतात, परंतु पुरुष क्रिकेटपटूंच्या बाबतीत उन्मुक्त हा असे करणारा पहिला भारतीय असेल. अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उन्मुक्तने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅचविनिंग शतक झळकावले होते.
अशी राहिली कारकीर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व केलेल्या उन्मुक्तने ६७ प्रथमश्रेणी सामन्यात ३१.५७ च्या सरासरीने ३३७९ , १२० लिस्ट ए सामन्यात ४१.३३ च्या सरासरीने ४५.०५ व ७७ टी२० सामन्यात १५५६ धावा केल्या आहेत. एक वर्ष तो उत्तराखंड क्रिकेट संघाचा देखील सदस्य होता. आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स या संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याची जागा धोक्यात आणू शकतो ‘हा’ खेळाडू; म्हणाला, ‘मी जास्तीत जास्त षटकं टाकेल’
INDvNZ, 1st Test, Live: भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, श्रेयस अय्यरचे झाले कसोटी पदार्पण
हरभजन सिंगने विकला आपला मुंबईतील लक्झरी अपार्टमेंट, जाणून घ्या किती किंमतीत झाला सौदा?