इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा फिव्हर सर्वत्र पाहायला मिळत आहे. आधी ८ संघ आयपीएल खेळत होते, पण आता या हंगामात एकूण १० संघ खेळताना दिसतायत. विशेष म्हणजे, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या हंगामात प्रेक्षकांना प्रत्यक्षात सामना पाहण्यासाठी एन्ट्री दिलीये. अशात या प्रत्येक संघाचे चाहते आपल्या संघाशी असलेल्या जिव्हाळ्यापोटी मैदानात येऊन त्यांचा उत्साह वाढवत असतात. अशामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची चाहती असलेल्या एका मुलीचा हातात पोस्टर घेतलेला फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२२मधील २२वा सामना मंगळवारी (दि. १२ एप्रिल) डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमी स्टेडिअम येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore) संघात पार पडला. या सामन्यादरम्यान बेंगलोरच्या एका चाहतीचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती एक पोस्टर घेतलेली दिसत आहे. या पोस्टरवर लिहिले होते की, “जोपर्यंत आरसीबी संघ ट्रॉफी जिंकत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही.” या पोस्टर गर्लचा हा फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे.
Focus on the poster guys holding 🤣🤣#CSKvsRCB pic.twitter.com/sXYr7Gnj2s
— Rishabh Srivastava (@AskRishabh) April 12, 2022
आमने-सामने कामगिरी
चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आतापर्यंत २८ सामने खेळले आहेत. यातील चेन्नईने १८ सामन्यात विजय मिळवला आहे, तर बेंगलोरला ९ वेळा चेन्नईला नमवण्यात यश आले आहे. तसेच, १ सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
सामन्याबद्दल थोडक्यात
आयपीएल २०२२च्या २२व्या सामन्यात बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. चेन्नईने आपल्या अंतिम अकरा संघात कोणताही बदल केला नाही. दुसरीकडे बेंगलोर संघासाठी जोश हेजलवूड पदार्पण करत आहे. यावेळी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावत चेन्नईने २१५ धावा केल्या होत्या. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘धोनी ओपनिंग करून संघाला संकटातून काढू शकतो बाहेर’, माजी यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे विधान
‘बोल, कधी सोडतोय नोकरी’, हार्दिकची फिफ्टी झाल्यावर नोकरी सोडणार म्हटलेला कार्यकर्ता जोरात ट्रोल
‘श्रीलंकेच्या सर्व खेळाडूंनी आयपीएलसोडून मायदेशी परत यावे’, अर्जुन रणतुंगा यांची साद