नुकताच भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India vs South Africa) संपन्न झाला. या दौऱ्यावर झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. तर ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभव पत्करावा लागला होता. कसोटी मालिका झाल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता भारतीय कसोटी संघाचा पुढील कर्णधार कोण होईल? यासाठी स्पर्धा झाली आहे.
यामध्ये मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (Kl Rahul), रिषभ पंत (Rushabh pant) आणि जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) यांचा समावेश आहे. दरम्यान भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण जसप्रीत बुमराहबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
जसप्रीत बुमराहला कर्णधारपद देण्याबाबत बोलताना भरत अरुण (Bharat arun) म्हणाले की, ” जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदासाठी योग्य मानसिकता आहे, पण त्याला कर्णधारपद देणे खूप कठीण जाईल. कारण त्याने तिन्ही स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक आहे, तो ते करू शकेल का? हा प्रश्न पडतो कारण जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाज आहे आणि त्याला ब्रेक देणे आवश्यक आहे.”
भरत अरुण यांचे म्हणणे आहे की केएल राहुल, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यात संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. एका फलंदाजाला संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. कारण तो विश्रांती न घेता सामने आणि मालिका खेळू शकतो.
भारतीय संघाला येत्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी श्रीलंका संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे लवकरच भारतीय संघाला नवीन कर्णधार मिळू शकतो. रोहित शर्मा या शर्यतीत सर्वात पुढे आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यावेळी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुलने संघाचे नेतृत्व केले होते. तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले होते. या सामन्यादरम्यान त्याला कर्णधार पदाबाबत प्रश्न विचारला असता त्याने, “संधी मिळाली तर करू..” असे म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या :
रवी कुमारच्या जादुई चेंडूने फलंदाजही बुचकळ्यात, काही कळायच्या आतच उडून पडल्या दांड्या- VIDEO
एक अविस्मणीय क्रिकेट सामना! ४५ धावांवर बाद होऊनही इंग्लंडने मिळवला होता शानदार कसोटी विजय
हे नक्की पाहा :