पुणे : विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धेत दीपक कुमारच्या दोन गोलच्या जोरावर भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने शानदार विजय मिळवला.
वानवडी येथील एस. आर. पी. एफ. मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील मुलांच्या गटातील फुटबॉल स्पर्धेत भारती विद्यापीठ संघाने आयोजन स्कूल ऑफ डीझाईन संघाचा २-०ने पराभव केला. यात भारती विद्यापीठकडून दीपक कुमारने (५, २० मि.) दोन गोल केले. आकुर्डीच्या डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि लोहगावच्या डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.
अंश अग्रवालच्या दोन गोलच्या जोरावर ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्युट ऑफ एनवायरमेंट अँड डिझाईन संघावर २-०ने विजय मिळवला. अंशने ७ व्या आणि २२व्या मिनिटाला गोल केले.
डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी संघाने श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर २-०ने विजय मिळवला. विजयी संघाकडून आर्यन खवटे (६ मि.) आणि देवाशिष सरनोबत (१५ मि.) यांनी गोल केले.
निकाल – व्हॉलीबॉल मुले
१) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पिंपरी चिंचवड (एस.बी.पी. सी.ओ.ए.) वि. वि पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पी. व्ही.पी. सी. ओ. ए.) २५-२१, २६-२४.
२) सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एस. सी. ओ. ए.) वि. वि. डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, अंबी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.) २५-१२, २५-६.
३) डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), वि. वि. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एम.एम. सी. ओ. ए.) २५-१६, २५-२०.
४) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पिंपरी चिंचवड (एस.बी.पी. सी.ओ.ए.) वि. वि. डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, अंबी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.) २५-६, २५-५.
व्हॉलीबॉल मुली
१) मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एम.एम. सी. ओ. ए.) वि. वि. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बी. एन. सी. ए.) २५-२३, १०-२५, १५-४.
२) डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.) वि. वि. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पी. व्ही.पी. सी. ओ. ए.) २५-९, २५-१९.
बास्केटबॉल मुले
१) अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (ए. सी. ओ. ए.) – १९ वि. वि. ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर (बी. एस. ओ. ए.) – १८.
२) डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.) – २१ वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एस. सी. ओ. ए.) – १९.
३) मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एम.एम. सी. ओ. ए.) – ३६ वि. वि. आयोजन स्कूल ऑफ डीझाईन (ए. एस. ए. डी.) – १३.
४) पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पी. व्ही.पी. सी. ओ. ए.) – ३३ वि. वि. भारती विद्यापीठ डीम्ड युनीव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बी. व्ही. डी. यू.) – २८.
५) ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर (बी. एस. ओ. ए.) – ३३ वि. वि. आयोजन स्कूल ऑफ डीझाईन (ए. एस. ए. डी.) – १४.
बास्केटबॉल मुली
१) भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बी. एन. सी. ए.) – ३९ वि. वि. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पी. व्ही.पी. सी. ओ. ए.) – १३.
२) मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एम.एम. सी. ओ. ए.) – २२ वि. वि. डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.) – ९.
फुटबॉल मुली
१) सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १ (श्रुती वीर १७ मि.) वि. वि. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १ (ईशा अभोणकर ७ मि.)
२) मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ० बरोबरी वि.
पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पी. व्ही.पी. सी. ओ. ए.) -०
महत्वाच्या बातम्या –
धनश्री वर्मा’घरच्यांना यामुळे फरक पडतोय…’, ट्रोलर्सवर संतापली धनश्री वर्मा, वाचा काय आहे प्रकरण
हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा; हॉकी हरयाणाचा आसाम हॉकीवर 15-0असा विजय