महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने गांवदेवी क्रीडा व युवक मंडळ, भातसाई आयोजित राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.
गांवदेवी क्रीडा व युवक मंडळाची ही सुवर्ण महोस्तवी कबड्डी स्पर्धा असून कै. शांताराम मा. कोतवाल क्रीडा नगरीत दिनांक ७ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधी मध्ये यास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आजपासून भातसाई गावात राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे. बालाजी प्रतिष्ठान विरुद्ध नेव्हल डॉकयार्ड आणि चव्हाण उद्योग सोलापूर विरुद्ध रिझर्व्ह बँक यादोन सामान्यांनी स्पर्धेला सुरुवात होईल. यास्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले असून त्याची ४ गटात विभाजन केले आहे. चार दिवस होणाऱ्या यास्पर्धेत साखळीत एकूण २४ सामने, बादफेरीत ७ सामने असे एकूण ३१ सामने खेळवण्यात येतील.
राज्यस्तरीय व्यावसायिक स्पर्धेची गटवारी:
‘अ’ गट: भारत पेट्रोलियम, सेन्ट्रल बँक, बालाजी प्रतिष्ठान पुणे, नेव्हल डॉकयार्ड मुंबई
‘ब’ गट: एयर इंडिया, युनियन बँक, जे. एस. डब्लू. रायगड, ठाणे पोलीस
‘क’ गट: महाराष्ट्र पोलीस, सेन्ट्रल रेल्वे, मुंबई पोर्ट, विनोद कन्स्ट्रक्शन रोहा
‘ड’ गट: महिंद्रा अँड महिंद्रा, चव्हाण उद्योग सोलापूर, रिझर्व्ह बँक, रायगड पोलीस