इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेला (Ipl 2022) येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या स्पर्धेसाठी मेगा ऑक्शन येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या मेगा ऑक्शन सोहळ्यात (Ipl 2022 mega auctions) तब्बल १२०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये भूतानच्या एका खेळाडूने देखील नाव नोंदणी केली आहे.
भूतानचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे. तसेच या देशात फुटबॉलही खेळला जातो. इथे क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. परंतु आनंदाची बाब अशी आहे की, या देशातूनही आता क्रिकेटपटू बाहेर येऊ लागले आहेत. अष्टपैलू खेळाडू मिक्यो दोरजीने आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनसाठी नाव नोंदणी केली आहे.
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, मिक्यो दोरजीने म्हटले आहे की, “आयपीएल स्पर्धा खेळणे हे माझे शेवटचे स्वप्नं आहे. अनेकांनी पाहिले की, ऑक्शनसाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंच्या यादीत भूतानच्या एकमेव खेळाडूचे नाव आहे. त्यानंतर मला माझे मित्र कॉल करू लागले. त्यांना नाही माहित की, ही प्राथमिक फेरी आहे. नावं शॉर्टलिस्ट केल्यानंतर मला माहीत आहे की, माझे नाव त्यात नसेल. तरीदेखील भूतानसाठी नाव नोंदणी करणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.”
मिक्यो दोरजीसाठी भारतात येणं मोठी गोष्ट नाहीये. त्याने दार्जिलिंगच्या सेंट जोसेफ शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर २०१८ आणि २०१९ मध्ये तो गोलंदाजी शैली सुधारण्यासाठी भारतात आला होता. एकदा जेव्हा तो टीम हॉटेलमध्ये महेंद्रसिंग धोनीला भेटला तेव्हा त्याला माजी भारतीय कर्णधाराने कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून त्याने आणखी जोरदार मेहनत करायला सुरुवात केली होती.
महत्वाच्या बातम्या :
मुंबईकडे आयपीएल २०२२ चे यजमानपद! बीसीसीआयने केला आयोजनाचा मास्टरप्लॅन
हे नक्की पाहा :