भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या मते शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी भुवनेश्वर कुमार हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. भुवनेश्वर कुमारच्या कालच्या कामगिरीमुळेच आम्ही सामना जिंकू शकलो असेही तो म्हणाला.
“भुवनेश्वर कुमारचे चेंडूवरील नियंत्रण खूपच उत्तम आहे आणि त्याने त्याच्या गोलंदाजीचा स्तर उंचवला आहे. शेवटच्या षटकांमध्ये जेव्हा तो हळू चेंडू टाकतो तेव्हाही त्याचे चेंडूवरील नियंत्रण चांगले असते.
त्यातही तो जेव्हा शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करतो तेव्हा ही त्याचा चेंडूच्या टप्पा बरोबर असतो. शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो सर्वोत्तम गोलंदाज आहे.” असे तो म्हणाला.
भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन हे आयपीएलमध्ये सनरायजर्स या संघाकडून एकत्र खेळतात. नियमित कालावधीने विकेट्स घेऊन त्याने आयपीएलमध्ये सनरायजर्स संघाला देखील विजय मिळवून दिले आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताला आव्हान टिकवण्यासाठी दुसरा सामना जिंकणे अत्यंत गरजेचे होते.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाला भुवनेश्वर कुमारने नियमित कालावधीने धक्के दिले आणि न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना तंबूत परत पाठवले.
नवीन चेंडूचा परिपूर्ण वापर करून त्यानी मार्टिन गप्टील आणि कोलिन मुंरो या दोन सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर शेवटच्या षटकात त्यानी हेन्री निकोल्स या फलंदाजाला बाद केले. शेवटच्या षटकात ही त्याने खूप चांगली गोलंदाजी करून फलंदाजांना बांधून ठेवले आणि जास्त धावा होऊ दिल्या नाहीत.
याच वर्षी श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने भुवनेश्वर कुमारला आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाज असे संबोधले होते.