क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर हा सामना खेळला जात असून, पहिल्या दोन दिवसात न्यूझीलंडने अप्रतिम खेळ करत सामन्यावर वर्चस्व गाजवले आहे. मात्र, सध्या भारतात असलेला भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा अचानकपणे ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे.
भुवनेश्वर होऊ लागला ट्विटरवर ट्रेंड
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एजबॅस्टन येथे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळत असताना, श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून निवड झालेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे.
भुवनेश्वर ट्विटरवर ट्रेंड होण्याचे कारण म्हणजे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांना बळी मिळविण्यासाठी आलेले अपयश होय. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर टॉम लॅथम व डेवॉन कॉनवे यांनी तब्बल ३४ षटके भारतीय गोलंदाजांना यश मिळवू दिले नाही. या कारणाने अनेक चाहत्यांनी भारतीय संघाला बळी मिळवण्यासाठी भुवनेश्वर कुमारची गरज असल्याचे म्हणत ट्विट करणे सुरु केले.
एका चाहत्याने ट्विट करत लिहिले, ‘माझ्यामते मोहम्मद सिराज भारताच्या संघात हवा होता. भुवनेश्वर कुमारनंतर तो भारताचा सर्वोत्कृष्ट स्विंग गोलंदाज आहे. सध्या खेळत असलेल्या तिघे उत्कृष्ट आहेत. मात्र, आम्ही भुवनेश्वरला मिस करत आहोत.’
I really believe Siraj should've been included in the XI. He's probably the best swing bowler we have after Bhuvi and he can give you longer spells as well….
These 3 are great, but they're just seam bowlers.
I really miss Bhuvneshwar Kumar!! 😥😥#INDvNZ #WTCFinal— Satwik Red ⭕ (@SatwikBiswal) June 20, 2021
अन्य एका ट्वीटर वापरकर्त्याने ट्विट करत म्हटले, ‘येथे भारतीय संघात कोणी स्विंग गोलंदाज आहे का? सध्या आपल्याकडे भुवनेश्वर व दीपक चाहर आहेत.’
Is there any swing bowler in Indian team ?
Currently we have Bhuvi and Chahar ig— Mustafa🧢 (@accio_luck) June 20, 2021
अशा प्रकारे अनेक चाहत्यांनी भुवनेश्वर व सिराज या ऐतिहासिक सामन्यात खेळायला हवे होते असे म्हटले आहे.
https://twitter.com/CAA_256/status/1406611473913114634
Started to miss Bhuvneshwar Kumar already. Anybody else? #IndiaVsNewZealand
— Shashank Bhargava (@ShaBhargava) June 20, 2021
India is missing Bhuvneshwar Kumar in their bowling line up specially whilst other Indian pacers are being unable to generate swings. #WTCFinal2021
— Sakar Sedhain (@Sakaronsport) June 20, 2021
Imagine Bhuvi on this deck in this condition.#WTCFinal #INDvNZ #bhuvneshwarkumar
— Sachin Karnawat (@SachinKarnavat) June 20, 2021
https://twitter.com/iabhinavpratap/status/1406635850474033155
अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे वर्चस्व
न्यूझीलंडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या तीन दिवसांवर वर्चस्व गाजवलेले दिसून येते. कायले जेमिसनच्या पाच बळींच्या जोरावर न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला. भारतासाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावा बनविल्या.
प्रत्युत्तरात, टॉम लॅथम व डेवॉन कॉनवे यांनी ३४.२ षटकात ७० धावांची सलामी दिली. लॅथम ३० धावांवर बाद झाल्यानंतर कॉनवेने आपला अप्रतिम फॉर्म कायम राखत अर्धशतक पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपण्यासाठी दोन चेंडू शिल्लक असताना तो ५४ धावांवर बाद झाला. तिसऱ्या दिवसाखेर, न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा बनविला होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरतो! पाहा ‘ही’ आकडेवारी
निष्काळजी फटका मारून बाद झालेल्या रिषभ पंतवर भडकले नेटकरी, ‘असा’ घेतला समाचार
भारतीय क्रिकेटसाठी २० जून का आहे सर्वात खास? घ्या जाणून