---Advertisement---

विराट आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरतो! पाहा ‘ही’ आकडेवारी

On: रविवार, जून 20, 2021 11:28 PM
---Advertisement---

प्रथमच आयोजित होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान सुरू आहे. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर हा ऐतिहासिक सामना खेळवला जातोय. या सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा विराट कोहली हा आधुनिक युगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानला जातो. मात्र, अशा प्रकारच्या आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीतील त्याची आकडेवारी पाहिल्यास तो भारतासाठी कमजोर बाजू असल्याचे स्पष्ट होत आहे.

न्यूझीलंडविरुद्ध करू शकला नाही मोठी खेळी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पहिल्या दिवशी त्याने ४४ धावा काढून भारताचा डाव सावरला. परंतु, दुसऱ्या दिवशी तो या धावसंख्येत एकाही धावसंख्येची भर न घालता कायले जेमिसनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यामुळे, कोहलीचा मोठ्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यात अपयशी होण्याचा इतिहास कायम राहिला.

विराटची आयसीसी अंतिम सामन्यात खराब कामगिरी
विराट कोहलीने भारतासाठी २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ हजार पेक्षा जास्त धावा जमा आहेत. तेव्हापासून आजतागायत तो पाचवेळा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात खेळला आहे. तो या पाच सामन्यांत केवळ एक अर्धशतक ठोकू शकला. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या ७७ राहिली आहे.

विराटने २०११ वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळताना ३५ धावा बनविल्या होत्या. त्यानंतर, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक ४३ धावा काढल्या. विराटचे आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यातील एकमेव अर्धशतक (७७ धावा) २०१४ टी२० विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध आले होते.

त्यानंतर, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तो पाकिस्तान विरुद्ध केवळ ५ धावा बनवू शकला होता. त्यानंतर, आता या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातदेखील तो अर्धशतकाची वेस ओलांडून शकला नाही.

कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताकडून पहिल्या डावात कोणत्याच फलंदाजाला ५० धावांचा आकडा गाठता आला नाही. अजिंक्य रहाणे अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. मात्र तो ४९ धावांवर झेलबाद झाला. या डावात भारताला सर्वबाद २१७ धावाच करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आगामी काळात भारतात रंगू शकतात ‘या’ तीन मोठ्या आयसीसी स्पर्धा

निष्काळजी फटका मारून बाद झालेल्या रिषभ पंतवर भडकले नेटकरी, ‘असा’ घेतला समाचार

तब्बल ७०६ बळी घेणाऱ्या वॉर्नला मिळाला फिरकी गोलंदाजी शिकण्याचा सल्ला; सेहवागने दिले ‘असे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---