भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान १९ जूनपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु झाला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, न्यूझीलंडचा अंतिम सामन्यासाठीचा संघ पाहून अनेक समीक्षकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांनीदेखील या संघ निवडीवर नाराजी व्यक्त केली. मात्र त्यानंतर त्याला चक्क एका चाहत्याने ट्विटरवरून सल्ला दिला. ज्यावर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने देखील मजेदार टिप्पणी केली.
न्यूझीलंडचा असा आहे संघ
या ऐतिहासिक सामन्यात न्यूझीलंड संघाने चार वेगवान गोलंदाजांना अंतिम अकरामध्ये संधी दिली. तसेच मध्यमगती गोलंदाज म्हणून कॉलिन डी ग्रॅंडहोम याला निवडले गेले. एजाज पटेलसारखा फिरकीपटू उपलब्ध असताना देखील त्याला संघात न निवडल्याने शेन वॉर्न नाराज दिसला.
त्याने ट्विट करत लिहिले, ‘न्यूझीलंडने या महत्त्वपूर्ण सामन्यात एकही क्रिकेटपटू खेळवला नाही यामुळे मी खुश नाही. या खेळपट्टीवर आत्ताच पायांचे ठसे उमटू लागले आहेत. हे असेच राहिले तर खेळपट्टीवर चेंडू स्पिन होईल. भारताने प्रथम फलंदाजी करताना २८५-३०० धावा बनविल्या आणि वातावरण चांगले राहिले तर, सामना लवकर संपेल.’
https://twitter.com/ShaneWarne/status/1406240569815228427
तुला फिरकी गोलंदाजी समजते का?
शेन वॉर्नच्या ट्विटखाली रिप्लाय करताना एका चाहत्याने लिहिले, ‘शेन तुला माहित आहे का चेंडू केव्हा स्पिन होतो? खेळपट्टी कोरडी झाल्यावर चेंडू वळत असतो आणि ही खेळपट्टी कोरडी होणार नाही कारण येथे भरपूर पाऊस पडला आहे.’
सेहवागने घेतली मजा
भारताचा दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानेही वॉर्नची मजा घेताना रिप्लाय दिला, ‘या ट्विटची फ्रेम बनवून घे आणि थोडी स्पिन गोलंदाजी शिकायचा प्रयत्न कर.’
https://twitter.com/virendersehwag/status/1406285597249982468
शेन वॉर्न याला जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकीपटूपैकी एक मानले जाते. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ७०६ बळी मिळवले होते. ऑस्ट्रेलियाने मिळवलेल्या अनेक शानदार विजयांमध्ये त्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC Final: भारताचा डाव उध्वस्त करणाऱ्या काईल जेमिसनच्या नावाची झाली इतिहासात नोंद
‘हा सामना पाहण्याचा प्रयत्न की…?’, रोहितच्या दुर्बिणीच्या फोटोवर पत्नी रितिकाची भन्नाट प्रतिक्रिया
टोकियो ऑलिंपिकच्या तयारीसाठी बीसीसीआयचाही हातभार, भारतीय पथकासाठी तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे योगदान






