---Advertisement---

WTC Final: भारताचा डाव उध्वस्त करणाऱ्या काईल जेमिसनच्या नावाची झाली इतिहासात नोंद

On: रविवार, जून 20, 2021 9:02 PM
---Advertisement---

शनिवारपासून (१९ जून) भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर प्रथमच आयोजित होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडच्या सर्व अनुभवी गोलंदाजांनी ढगाळ वातावरणाचा फायदा घेत भारताचा पहिला डाव अवघ्या २१७ धावांमध्ये गुंडाळला. युवा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन याने पाच बळी मिळवत, न्यूझीलंडच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले. या कामगिरीसह त्याचा समावेश गोलंदाजांच्या एका खास यादीत झाला.

जेमिसनची अंतिम सामन्यात भेदक गोलंदाजी
न्यूझीलंड संघातील सर्वात तरूण खेळाडू असलेल्या काईल जेमिसनने या ऐतिहासिक सामन्यात न्यूझीलंडसाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. भारताच्या दर्जेदार फलंदाजांविरूद्ध गोलंदाजी करताना जेमिसनने २२ षटकात तब्बल १२ निर्धाव षटके टाकत ३१ धावा देऊन ५ बळी मिळवले. त्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, ईशांत शर्मा व जसप्रीत बुमराह यांचा समावेश होता.

अंतिम सामन्यात अशी कामगिरी करणारा चौथा गोलंदाज
काईल जेमिसनने या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात पाच बळी घेत आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बळींचे पंचक घेणारा चौथा गोलंदाज होण्याचा मान मिळवला.

कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वप्रथम पाच बळी मिळवण्याचा कारनामा ऑस्ट्रेलियाचे महान वेगवान गोलंदाज गॅरी गिल्मोर यांनी केला होता. त्यांनी १९७५ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केलेली.

वेस्ट इंडीजच्या जोएल गार्नर यांनी १९७९ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ५ बळी आपल्या नावे केले होते. दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू जॅक कॅलिसने १९९८ मध्ये पहिल्यांदा आयोजित झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पाच बळी मिळवण्याची किमया केली होती. त्यानंतर आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्यावहिल्या अंतिम सामन्यात पाच बळी मिळविण्याची किमया जेमिसनने केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘हा सामना पाहण्याचा प्रयत्न की…?’, रोहितच्या दुर्बिणीच्या फोटोवर पत्नी रितिकाची भन्नाट प्रतिक्रिया

टोकियो ऑलिंपिकच्या तयारीसाठी बीसीसीआयचाही हातभार, भारतीय पथकासाठी तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे योगदान

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत जेमिसनचा डंका, ‘या’ यादीत गाठले अव्वल स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---