रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या टी20 विश्वचषक 2022च्या सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 71 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य सामन्यातही प्रवेश केला. उपांत्य सामन्यात भारत इंग्लंडविरुद्ध दोन हात करणार आहे. तत्पूर्वी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने एक विकेट घेताच आपल्या नावावर दोन विक्रमांची नोंद केली.
भारताने दिलेल्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी झिम्बाब्वे संघाकडून या सामन्यात वेस्ली मधेवेरे (Wessly Madhevere) आणि कर्णधार क्रेग इर्विन (Craig Ervine) हे फलंदाजीला उतरले होते. यावेळी स्ट्राईकवर वेस्ली होता. तसेच, भारताकडून पहिले षटक भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) टाकत होता. भुवनेश्वरने पहिला चेंडू टाकताच वेस्लीने तो कव्हर्सच्या दिशेने मारला. यावेळी त्या जागी क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने झेप घेत हा चेंडू झेलला (Virat Kohli Catch) आणि वेस्लीला तंबूचा रस्ता धरण्यास भाग पाडले.
Fantastic catch by Virat Kohli. pic.twitter.com/c7MijlueFa
— Tanuj Singh (@ImTanujSingh) November 6, 2022
भुवनेश्वरचा पहिला विक्रम
भुवनेश्वरने डावातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. विशेष म्हणजे, 2022मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भुवनेश्वरने पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याची ही तिसरी वेळ होती. इतर कोणत्याही गोलंदाजाला त्याच वर्षात एकापेक्षा जास्त वेळा अशी कामगिरी करता आली नाहीये.
भुनवेश्वरने 2022 या वर्षात सर्वप्रथम 24 फेब्रुवारी रोजी लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. अशीच कामगिरी त्याने याच वर्षी 9 जुलै रोजी एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धही केली होती. त्यानंतर आता 6 नोव्हेंबर रोजी भुवनेश्वरने झिम्बाब्वेविरुद्ध मेलबर्न येथे डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याची कामगिरी करून दाखवली.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे भारतीय
भुवनेश्वर कुमार- विरुद्ध श्रीलंका (24 फेब्रुवारी, 2022)
भुवनेश्वर कुमार- विरुद्ध इंग्लंड (09 जुलै, 2022)
भुवनेश्वर कुमार- विरुद्ध झिम्बाब्वे (06 नोव्हेंबर, 2022)*
भुवनेश्वरचा दुसरा विक्रम
भुवनेश्वरने पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर पुढील पाचही चेंडू त्याने निर्धाव टाकले. यामुळे त्याच्या नावावर दोन खास विक्रमांची नोंद झाली. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारा गोलंदाज बनला. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 10 वेळा निर्धाव षटके टाकली आहेत. त्याच्यापाठोपाठ जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी असून त्याने 9 वेळा अशी कामगिरी केली आहे. यानंतर संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकावर नुवान कुलसेकरा आणि मुस्तफिजूर रहमान आहेत. यांनी प्रत्येकी 6 वेळा निर्धाव षटके टाकली आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारे गोलंदाज
10 षटके- भुवनेश्वर कुमार*
9 षटके- जसप्रीत बुमराह
6 षटके- नुवान कुलसेकरा
6 षटके- मुस्तफिजूर रहमान
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! विराटने घेतला झिम्बाब्वेच्या सलामीवीराचा अफलातून कॅच, व्हिडिओ वेधतोय सर्वांचे लक्ष
‘सूर्य’ पुन्हा तळपला, वादळी अर्धशतकासह मोठा विक्रम नावावर; ठरलाय एकटाच भारतीय