---Advertisement---

भुवनेश्वर कुमारने पत्नीचा वाढदिवस बनवला खास, दिले शानदार सरप्राईज; होतंय कौतुक!

On: शनिवार, ऑगस्ट 17, 2024 8:42 PM
Bhuvi wife birthday surprise
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आयपीएल 2024 मध्ये तो शेवटचा सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसला होता. यादरम्यान भुवनेश्वर कुमार आपल्या फावल्या वेळेचा चांगला उपयोग करत असून कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. नुकतेच भुवनेश्वर कुमारने त्याची पत्नी नुपूरच्या जन्मदिनी आपल्या पत्नीला एक आश्चर्यकारक सरप्राईज दिले आहे. त्याचे सरप्राईज पाहून चाहतेही त्याचे कौतुक करताना थकत नाहीयेत.

भारतीय क्रिकेटर भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि तिचा पती भुवी त्यांच्या मुलीसोबत वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. ही पूर्ण सरप्राईज पार्टी होती, ज्याची नुपूरला कल्पनाही नव्हती.

व्हिडिओ शेअर करताना नुपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “भुवी सरप्राईज देण्यात कधीच कमी पडत नाही. आजचा क्षण मी नेहमी लक्षात ठेवेन.” नुपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला भुवीच्या काही मित्रांनीही हजेरी लावली होती. त्याचवेळी क्रिकेट चाहते भुवनेश्वरच्या पत्नीच्या या व्हिडिओवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि नेहमीप्रमाणे नुपूरच्या साधेपणाचे कौतुकही करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nupur Nagar (@nupurnagar)

नुपूर आणि भुवी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात
भुवी आणि नुपूर हे दोघेही एकमेकांचे शेजारी होते, त्यामुळे दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते आणि दोघांचे वडील पोलिसांत काम करत होते. त्यांच्या बालपणीच्या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते दोघांनाही कळले नाही. काही वर्षे डेट केल्यानंतर भुवी आणि नुपूरने 23 नोव्हेंबर 2017 रोजी लग्न केले. भुवी हा भारतीय क्रिकेटर आहे, तर नुपूर पेशाने इंजिनिअर आहे. तिने नोएडा येथून बीटेक केले आहे. दोघेही एका मुलीचे पालक आहेत.

भुवनेश्वर कुमारने 2022 साली टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून भुवनेश्वर देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसतो.

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला जिवंत असेपर्यंत तिला त्रास देण्यात…”, मोहम्मद शमीच्या एक्स पत्नीची कोलकाता प्रकरणावरील पोस्ट व्हायरल
आश्चर्यकारक…! वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टाॅप-5 गोलंदाजांमध्ये एकही नाही भारतीय
ज्युनियर वॉल! राहुल द्रविडच्या मुलाचा रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये गगनचुंबी षटकार – Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---