---Advertisement---

ज्युनियर वॉल! राहुल द्रविडच्या मुलाचा रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये गगनचुंबी षटकार – Video

Samit Dravid
---Advertisement---

माजी भारतीय कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) महाराजा टी20 ट्रॉफीच्या चालू हंगामात म्हैसूर वॉरियर्सकडून खेळत आहे. समित पदार्पणाच्या सामन्यात विशेष खेळ दाखवू शकला नाही. मात्र स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बेंगळुरू ब्लास्टर्सविरुद्ध तो जबरदस्त शैलीत फलंदाजी करताना दिसला. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये गगनचुंबी षटकार मारताना दिसत आहे. त्याचा षटकार पाहून समालोचकही त्याची स्तुती करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.

पदार्पणाच्या सामन्यात समित केवळ 7 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी (16 ऑगस्ट) स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बेंगळुरू ब्लास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र पावसामुळे सामना 18 षटकांचा करण्यात आला. मनोज भंडगे (58*) आणि हर्षिल धर्मानी (50) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर म्हैसूर वॉरियर्सने 18 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा केल्या.

यादरम्यान समित चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा म्हैसूर वॉरियर्सची धावसंख्या 4.5  षटकांत 2 बाद 51 धावा होती. यावेळी उजव्या हाताच्या फलंदाजाने वेगवान गोलंदाज गणेशवर नवीनच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकून प्रेक्षकांना थक्क केले. सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नवीनने ऑफ स्टंपच्या बाहेर एक छोटा चेंडू टाकला. समितने तो चेंडू षटकारासाठी लाँग-ऑनकडील सीमारेषेबाहेर टोलवला. समितचा हा षटकार पाहून भारतीय क्रिकटप्रेमींना हिटमॅन रोहितची आठवण झाली. रोहित शर्माने 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानच्या नवीन उल हकविरुद्ध असाच षटकार मारला होता.

मात्र, पदार्पणाच्या सामन्याप्रमाणेच समित या सामन्यातही छोटेखानी खेळीवर बाद झाला. षटकार ठोकल्यानंतर षटकाच्या पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने एकूण सात धावा केल्या. अखेरीस, बेंगळुरू ब्लास्टर्सने 17.1 षटकांत 183 धावांचे लक्ष्य पार केले आणि चार विकेट्स राखून म्हैसूर वॉरियर्सविरुद्ध विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

रहाणेचा नवा अवतार! इंग्लंडमध्ये षटकारांचा पाऊस पाडत संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवले

अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचे ‘या’ संघाकडे यजमानपद! क्वालिफायर सामन्यांचे करणार आयोजन
18 वर्षीय फलंदाजानं शानदार शतक झळकावून रचला इतिहास!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---