नेपाळ क्रिकेट असोसिएशन (NCA) ने पुष्टी केली आहे की, (12 ते 21 एप्रिल 2025) दरम्यान काठमांडू येथे आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषक (ICC U-19 Men’s CWC) आशिया क्वालिफायर 2025चे आयोजन करणार. या डिव्हिजन 1 स्पर्धेचा विजेता आयसीसी पुरुषांच्या अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2026 साठी पात्रता मिळवणार आहे. नेपाळ क्रिकेट असोसिएशनने आपल्या एक्स अकाउंटवर सांगितले आहे की, यजमान नेपाळ व्यतिरिक्त अफगाणिस्तान, ओमान, हाँगकाँग, सिंगापूर आणि युएई हे संघ आशियाई क्षेत्रासाठी क्वालिफाय स्पर्धेत भाग घेतील.
नेपाळनं यंदाच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 2024च्या आयसीसी पुरुष अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला, तिथं त्यांनी पूर्व लंडनमधील बफेलो पार्क येथे अफगाणिस्तानविरुद्ध एका विकेटनं शानदार विजय मिळवला आणि सुपर सिक्ससाठी क्वालिफाय ठरले. पुरुष अंडर-19 विश्वचषक 2026चे आयोजन झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये केले जाणार आहे, त्यामध्ये 16 संघ भाग घेणार घेतील, त्यापैकी 5 संघ प्रादेशिक क्वालिफाय फेरीतील असणार आहेत.
फेब्रुवारी 2024 मध्ये अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा 79 धावांनी पराभव केला होता, तर अंडर-19 विश्वचषक विजेते म्हणून ऑस्ट्रेलिया स्पर्धेत उतरणार आहे. यजमान झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांनी 2026च्या सुरुवातीला होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
अंडर-19 विश्वचषक ही स्पर्धा 1988 मध्ये सुरू झाली आहे. आगामी स्पर्धा 16वी स्पर्धा असणार आहे. तत्पूर्वी भारतानं 5 वेळा पुरुष अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे, तर ऑस्ट्रेलियानं 4 वेळा जिंकला. पाकिस्ताननं 2 वेळा तर बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी एक वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे.
भारतीय संघानं (Team India) 5 वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे आणि 4 वेळा उपविजेतेपद पटकावलं आहे. 2000 मध्ये भारतानं मोहम्मद कैफच्या (Mohammad Kaif) नेतृत्वाखाली, 2008 मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली, 2012 मध्ये उन्मुक्त चंदच्या (Unmukt Chand) नेतृत्वाखाली, 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) नेतृत्वाखाली आणि 2022 मध्ये यश धुलच्या (Yash Dhull) नेतृत्वाखाली अंडर-19 विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
18 वर्षीय फलंदाजानं शानदार शतक झळकावून रचला इतिहास!
युवराज सिंग गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक का होणार? पाहा 3 मोठी कारणे
‘बाबर आझम’ नाही तर हे 3 स्टार फीट क्रिकेटर्स, माजी कर्णधाराचं खळबळजनक वक्तव्य