कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणावर सगळ्या क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. अत्यंत अमानुषपणे झालेल्या या हत्येनंतर जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी देखील निषेध नोंदवला. आता भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ हिनेदेखील इंस्टाग्रामवर पोस्ट करत तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला.
सध्या चर्चेत असलेल्या या प्रकरणावर पोस्ट करताना हसीन हिने लिहिले, ‘आपला समाज किती विचित्र आहे. महिला जिवंत असेपर्यंत तिला त्रास देण्यात कोणतीही कसर ठेवत नाहीत. जेव्हा तिचे निधन होते तेव्हा देखील फक्त मेणबत्त्या पेटवल्या जातात.’
हसीन ही शमीची पत्नी होती. काही वर्षांपूर्वी तिने देखील शमी याच्यावर घरगुती अत्याचाराचे व फसवणुकीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतलेला. असे असले तरी ती अद्यापही शमी याच्या विरोधात अनेकदा पोस्ट करत असते. या दोघांना एक मुलगी असून, ती आई हसीनसोबत राहते.
याच प्रकरणावर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी देखील निषेधाच्या पोस्ट केल्या होत्या. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याने सर्वप्रथम स्टोरी पोस्ट करत निषेध नोंदवला होता. त्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने देखील या प्रकरणाची निंदा केली. इतर भारतीय खेळाडूंनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
View this post on Instagram
9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत एक संतापजनक घटना घडली. तेथील सेमिनार हॉलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा बलात्कार करून खून करण्यात आला. तेव्हापासून या प्रकरणावर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून सर्वांनी न्याय देण्याची मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी संपदेखील पुकारला.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्युनियर वॉल! राहुल द्रविडच्या मुलाचा रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये गगनचुंबी षटकार – Video
रहाणेचा नवा अवतार! इंग्लंडमध्ये षटकारांचा पाऊस पाडत संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवले
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचे ‘या’ संघाकडे यजमानपद! क्वालिफायर सामन्यांचे करणार आयोजन