30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुरु होणार आहे. या विश्वचषकाआधी भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने युजवेंद्र चहल होस्ट करत असलेल्या ‘चहल टीव्ही’ या शोच्या माध्यमातून चाहत्यांना खास संदेश दिला आहे.
भारतीय संघ दुसरा सराव सामना खेळण्यासाठी लंडनवरुन कार्डीफला प्रवास करतानाच्या दरम्यानचा हा चहल टीव्हीचा व्हिडिओ बीसीसीआयने अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चहलने बसमध्ये भारतीय खेळाडूंशी संवाद साधला आहे.
या दरम्यान चहलशी बोलताना भुवनेश्वर म्हणाला, ‘आम्ही विश्वचषकात आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करु. मी चाहत्यांना सांगेल की आम्हाला संपूर्ण स्पर्धेदरम्यान पाठिंबा देत रहा.’
याबरोबरच यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने चहलशी बोलताना गमतीने म्हटले की ‘मी चहल टीव्हीवर येऊन खूश झालो आहे. या शोमध्ये येणे ही खूप मोठी गोष्ट आहे. या शोमध्ये येणे इतके सोपे नाही.’
तसेच सलामीवीर फलंदाज शिखर धवन त्याच्या आयसीसीच्या स्पर्धेतील कामगिरीबद्दल आणि इंग्लंडमध्ये खेळण्याच्या अनुभवाबद्दल म्हणाला, ‘इंग्लंडमध्ये खेळताना खूप चांगले वाटते आणि मी अनेक आयसीसीच्या स्पर्धा खेळलो आहे. माझी कामगिरीही चांगली झाली आहे आणि यावेळीही चांगली कामगिरी करुन विजय मिळवण्याची प्रेरणा आहे.’
शिखरने 2013 मध्ये इंग्लंडला पार पडलेल्या चॅम्पिय़न्स ट्रॉफीमध्ये दमदार फलंदाजी केली होती. तसेच भारतासाठी या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यातही त्याने महत्त्वाचा वाटा उचलला होता.
त्याचबरोबर यष्टीरक्षक एमएस धोनीने मात्र चहल टिव्हीवर बोलायला हसून नकार दिला.
भारताचा बांगलादेश विरुद्ध दुसरा सराव सामना आज (28 मे) कार्डीफ येथे होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
CHAHAL TV IS BACK: Chahal TV???? ???? makes its World Cup debut as #TeamIndia hit the road to Cardiff from London ????
Some exciting Bus stories in Part 1 of the series – by @RajalArora @yuzi_chahal
Watch full video here – https://t.co/TUGf4koWb5 pic.twitter.com/Oe3L9v0yzo
— BCCI (@BCCI) May 27, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–पाकिस्तानचा स्टार फलंदाज म्हणतो, बुमराहने ती चूक केली नसती तर…
–Video: चेल्सीच्या स्टार फुटबॉलपटूने विराट कोहलीच्या टीम इंडियाला दिल्या खास शुभेच्छा
–‘यूनिवर्स बॉस’ गेलने या दिग्गज खेळाडूला केले २०२३ चा विश्वचषक खेळण्यासाठी प्रभावित…






