30 मेपासून 12 व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरुवात होत आहे. हा विश्वचषक काही वरिष्ठ खेळाडूंचा शेवटचा विश्वचषक असण्याची शक्यता आहे. या वरिष्ठ खेळाडूंमध्ये विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आणि न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलरचा समावेश आहे.
39 वर्षीय गेल यावेळी त्याच्या कारकिर्दीतील 5 वा आणि शेवटचा विश्वचषक खेळत आहे. तर 35 वर्षीय टेलर चौथा विश्वचषक खेळत आहे. त्यामुळे हा विश्वचषक टेलरचाही शेवटचा विश्वचषक असण्याची शक्यता आहे. पण टेलरने गेलकडून प्रभावित होत 2023 चा विश्वचषकही खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आयसीसीशी 2023 च्या विश्वचषकात खेळण्याबाबत बोलताना टेलर म्हणाला, ‘मी आत्ता 35 वर्षाचा आहे. पण पुढे काय होईल हे तुम्हाला माहित नसते. ख्रिस गेल हा संभवत: प्रेरणा आहे. तो या विश्वचषकात 39 वर्षाचा आहे आणि मी पुढील विश्वचषकापर्यंत 39 वर्षाचा होईल. त्यामुळे ही गोष्ट सोपी नाही. तूम्हाला माहीत नसते. हा कदाचित माझा शेवटचा विश्वचषक असू शकतो. पण जर हॅमस्ट्रिंग आणि काल्फच्या दुखापतीचा त्रास झाला नाही तर मी पुढील काही वर्षे खेळू शकतो.’
टेलरने या 2019 च्या विश्वचषकाच्या आधी भारता विरुद्ध पार पडलेल्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी करत तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. या सामन्यात न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन आणि टेलरने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 6 विकेट्सने विजय मिळवला होता.
या सामन्याबद्दल टेलर म्हणाला, ‘हा सराव सामना होता. त्याला त्याचप्रमाणे पहायला पाहिजे आणि त्या सामन्यातून जे पाहिजे ते घेतले पाहिजे. आम्ही मागील दोन, तीन महिने संघ म्हणून सामने खेळलेलो नाही. त्यामुळे या सामन्यात आमच्यातील कौशल्य तपासायचे होते.’
2015 च्या विश्वचषकात न्यूझीलंडने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात प्रवेश करण्याबाबत टेलर म्हणाला, ‘अंतिम सामन्यात प्रवेश करणे कठिण जाणार आहे. चार वर्षांपूर्वी अंतिम सामन्यात प्रवेश केला होता तेव्हा आम्ही घरच्या मैदानावर अनेक सामने खेळलो होतो. आम्हाला तेथील परिस्थिती खूप चांगली माहित होती.’
‘तूम्हाला जर चांगली सुरुवात मिळाली आणि लय कायम राहिली तर तूम्ही उपांत्य सामन्यात प्रवेश कराल आणि विश्वचषक जिंकण्यापासून फक्त दोन विजय दूर असाल.’
विश्वचषक 2019 मधील न्यूझीलंडचा पहिला सामना 1 जूनला श्रीलंका विरुद्ध कार्डिफ येथे होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–एका विश्वचषकात या संघाने केले आहेत सर्वाधिक शतके, टीम इंडिया आहे या स्थानावर
–या दिग्गज क्रिकेटपटूच्या निधनाची पसरली खोटी बातमी; स्वत: क्रिकेटपटूने केला खूलासा
–२०१९ विश्वचषकासाठी संधी मिळालेल्या ‘त्या’ खेळाडूचे शार्दुल ठाकुरने वाचवले होते करियर