30 मेपासून 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. आजपर्यंत विश्वचषकात अनेक विक्रम झाले आहेत. त्यातील एका विश्वविक्रम 2015 च्या विश्वचषकात श्रीलंका संघाने केला आहे.
2015 च्या विश्वचषकात एकूण 38 शतके झाली होती. यातील 8 शतके एकट्या श्रीलंका संघाने केली होती. त्यामुळे एका विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रमही त्यांनी आपल्या नावे केला होता.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरित्या पार पडलेल्या या विश्वचषकात श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने सर्वाधिक 4 शतके केली होती. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि भारत 5 शतकांसह दुसऱ्या स्थानावर होते.
विशेष म्हणजे श्रीलंकेने हा पराक्रम करताना 2011 च्या विश्वचषकात 7 शतकांचा केलेला आपला विश्वविक्रम मोडला होता. त्याआधी 2007च्या विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाकडून 6 शतके करण्यात आली होती. तर भारताकडून 1999, 2011 आणि 2015 च्या विश्वचषकात प्रत्येकी पाच शतके करण्यात आली होती.
याबरोबरच आजपर्यंत विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर असून त्यांनी आत्तापर्यंत 26 शतके केली आहेत. तर भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून भारताने आत्तापर्यंत 25 शतके विश्वचषकात केली आहे.
एका विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारे संघ –
8 शतके – श्रीलंका(2015)
7 शतके श्रीलंका(2011)
6 शतके – ऑस्ट्रेलिया(2007)
5 शतके – भारत (1999, 2011, 2015)
5 शतके – दक्षिण आफ्रिका(2015)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या दिग्गज क्रिकेटपटूच्या निधनाची पसरली खोटी बातमी; स्वत: क्रिकेटपटूने केला खूलासा
–२०१९ विश्वचषकासाठी संधी मिळालेल्या ‘त्या’ खेळाडूचे शार्दुल ठाकुरने वाचवले होते करियर
–हिटमॅन रोहित शर्माकडून पंड्या, धवन क्लिन बोल्ड, पहा व्हीडिओ