दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (सेना) मधील कसोटी सामन्यांमध्ये धावा करणे हे भारतीय फलंदाजांसाठी सर्वात कठीण काम आहे. मात्र, जे चांगले फलंदाज आहेत त्यांनी या देशांमध्ये धावा करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळणाऱ्या भारतीय संघातील टॉप-3 फलंदाजांची कामगिरी इतकी खराब आहे की, सेना देशात त्यांची सरासरी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारपेक्षा कमी आहे. या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांचा समावेश आहे.
भुवनेश्वर कुमारने सेना (SENA) देशांमध्ये आठ कसोटी सामन्यांच्या 16 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याने 30.61 च्या सरासरीने 398 धावा केल्या आहेत. भुवनेश्वरने या दरम्यान नाबाद 63 धावा करत तीन अर्धशतके झळकावली आहेत.
भारतीय कर्णधार रोहित त्याची 22वी कसोटी सेना (SENA) देशांमध्ये खेळत आहे. पण त्याची सरासरी (29.07) भुवीपेक्षाही कमी आहे. रोहितने आतापर्यंत खेळलेल्या 43 डावांमध्ये 1134 धावा केल्या आहेत. रोहितने सेना देशांमध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकं झळकावली आहेत.
भारतातील कसोटीत आपल्या अप्रतिम कामगिरीने खळबळ माजवणारा यशस्वी सेना (SENA) देशांत जाताच समोर येतो. यशस्वी जयस्वाल सेना (SENA) देशांमध्ये त्याची पाचवी कसोटी खेळत आहे. आतापर्यंत खेळलेल्या नऊ डावांमध्ये त्याने 26.55 च्या सरासरीने केवळ 239 धावा केल्या आहेत. गिलने सेना देशांमध्येही आठ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यातील 15 डावात त्याने केवळ 414 धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये गिलची सरासरी केवळ 29.57 इतकी आहे. गिलने या दरम्यान दोन अर्धशतके झळकावली आहेत.
हेही वाचा-
NZ VS ENG; शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडचा मोठा विजय, पण मालिका इंग्लंडच्या खिश्यात
रिंकू सिंगची कर्णधारपदी नियुक्ती, या प्रमुख स्पर्धेमध्ये संघाचे नेतृत्व करणार
3 कारणे ज्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरणार