वनडे विश्वचषकाच्या समाप्तीनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. 23 नोव्हेंबर पासून खेळल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करेल. या संघात जवळपास सर्वच युवा खेळाडू आहेत. अशात भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला संघात संधी मिळालेली नाही. त्यामुळे ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची अखेर असल्याचे बोलले जातेय.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या या मालिकेसाठी भारताच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली आहे. विश्वचषकात खेळलेले जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी या मालिकेत नसतील. त्यांच्या अनुपस्थितीत संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्शदीप सिंग व मुकेश कुमार सांभाळतील.
भारतीय संघाकडे असे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने आता भुवनेश्वर कुमार यांच्या पुनरागमनाची दारे बंद झाल्याचे बोलले जात आहे. भुवनेश्वर सध्या केवळ 33 वर्षांचा आहे. मात्र, मागील काही काळापासून त्याच्या गोलंदाजीतील वेग तसेच स्विंग कमी झालेला आहे. मागील दोन आयपीएल हंगामात त्याची कामगिरी प्रभावी झाली नव्हती.
भुवनेश्वर याने भारतासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना मागील वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर टी20 मालिकेत खेळला होता. त्यानंतर पूर्ण एक वर्ष झाले तरी तो अद्याप भारतीय संघासाठी खेळलेला नाही. युवा खेळाडूंच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आता तो भारतीय संघात दिसण्याची आशा मावळल्याचे बोलले जात आहे.
(Bhuvneshwar Kumar is no longer in the Indian teams contention)
महत्वाच्या बातम्या –
पराभवानंतर भारतीय गोलंदाजाच्या घराला पोलीस सुरक्षा, चिडलेल्या चाहत्यांमुळे आधीच घेतली खबरदारी
आयसीसीचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला तात्पुरता दिलासा, खेळण्याची दिली परवानगी पण…