---Advertisement---

फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर माजी क्रिकेटपटूचा भारतीय संघाला पाठिंबा; म्हणाला, “तुमच्या सर्वांचा…”

Indian Cricket team
---Advertisement---

विश्वचषक 2023 स्पर्धेत सलग 10 सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्स राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे भारतीय संघ खूप निराश झाला आहे. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिकने भारतीय संघाला पाठिंबा दिला आहे. कार्तिकने सांगितले की, 10 सामन्यांमध्ये पूर्ण वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात कसा चुकला हे समजणे त्यांच्यासाठी कठीण आहे.

मुरली कार्तिक (Murli Kartik) याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आणि लिहिले की, “विश्वचषकाच्या या हंगामात हा संघ हरला हे स्वीकारायला थोडा वेळ लागला. पण आधी ऑस्ट्रेलियाला खूप खूप शुभेच्छा. स्पर्धा कशी जिंकायची हे स्पष्ट करणारे पुस्तक आणि पत्र संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये वितरित केले जावे, आमच्या मुलांनी जे क्रिकेट खेळले त्याबद्दल त्यांचे जोरदार कौतुक केले पाहिजे. खेळात हरण्यात आदर किंवा अनादर नाही, पण गेले दोन महिने करोडो लोकांसाठी खूप चांगले होते. शाब्बास टीम इंडिया. तुमचा सगळ्यांना अभिमान वाटला.”

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने (47) चमकदार सुरुवात केली, पण त्याला दुसऱ्याबाजूने शुभमन गिल (Shubman Gill) याची साथ लाभली नाही. गिल अवघ्या 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघ 50 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 240 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 43 षटकांत 4 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात हेडने सर्वाधिक 137 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले तर भारत तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यापासून दूर राहिला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ भलेही अंतिम सामना हरला असेल, पण या संघाचे देशात आणि जगभरातून कौतुक होत आहे. भारतीय संघाने सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. (Former cricketer supports Indian team after losing in final Said All of you)

म्हत्वाच्या बातम्या

अखेर कॅप्टन बवुमा बोललाच! प्रचंड टीकेनंतर म्हणाला, “जेव्हा मी देशासाठी खेळतो…”
भावाला मिळाली नाही आगामी मालिकेसाठी संघात जागा; आगपाखड करत दिग्गज क्रिकेटर म्हणाला, ‘ही बकवास कधी थांबेल?’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---