हैद्राबाद | काल राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात हैद्राबादने ५ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकल्यामुळे स्पर्धेत प्ले-आॅफमध्ये प्रवेश करण्यासाठीचा सर्वात प्रबळ दावेदार म्हणून या संघाकडे पाहिले जाते.
या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादने जे सामने जिंकले आहेत त्यात गोलंदाजांचा वाटा खुप मोठा आहे. याचमुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर हैद्राबादचे सिद्धार्थ कौल आणि राशिद खान हे गोलंदाज आहेत.
Read- दोन मुंबईकर स्टार करणार भारतीय क्रिकेट संघाच नेतृत्व
कालचा सामना झाल्यावर भुवनेश्वर कुमारने राशिद खानची खास मुलाखत घेतली. यावेळी भुवीने त्याला काही प्रश्न विचारले. त्यात तुझ्या गोलंदाजीत एवढे वैविध्य कसे आहे? हे वैविध्य तु कसे आणले आहेस? असे प्रश्न केला.
यावर राशिदने उत्तर देताना, ” हे सगळं नैसर्गिक आहे. मी जेव्हा सराव करतो तेव्हा मी सतत काहीतरी नविन करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्या गोलंदाजीत सतत काहीतरी नविन दिसते. ” असे तो म्हणाला.
Read- १० पैकी ८ मॅच जिंकणारी हैद्राबादही होऊ शकते आयपीएलमधून बाहेर
तसेच मी अजूनही सरावात काही खास वेगळ्या शैलीची गोलंदाजी शिकलो आहे. त्याचा वापर मी आयपीएलमध्ये केला नाही परंतु मी तो कसोटीत करणार आहे असेही तो म्हणाला.
यावर भुवी राशिदला गमतीने म्हणाला की, तू वेगवेगळी गोलंदाजी कर परंतू भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्याच मात्र तु असं काही करु नकोस.
पहा संपुर्ण व्हिडीओ-
https://twitter.com/IPL/status/993724649702801408
Read- मुंबईकरांसाठी आजचा दिवस ठरणार गोड! या मोठ्या खेळाडूला मिळू शकते टीम इंडियात स्थान






