---Advertisement---

कोलंबोतील अविश्वसनीय विजयानंतर भुवनेश्वरने धोनीबरोबर केलेल्या ‘त्या’ भागीदारीच्या आठवणींना दिला उजाळा

On: गुरूवार, जुलै 22, 2021 8:53 AM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार हे दोघे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. या दोघांमध्ये ८ व्या विकेटसाठी ८४ धावांची नाबाद भागीदारी झाली. या खेळीनंतर भुवनेश्वर कुमारने माजी कर्णधार एमएस धोनीबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

भारतीय संघ २०१७ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर असताना भुवनेश्वर कुमार आणि एमएस धोनी यांनी मिळून भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढत विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यात देखील भारतीय संघ अडचणीत सापडला होता. ४७ षटकांमध्ये २३१ धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघाने २२ व्या षटकापर्यंत ७ बाद १३१ धावा केल्या होत्या. या सामन्यात अकीला धनंजयने ६ गडी बाद केले होते.

त्यावेळी असे वाटू लागले होते की भारतीय संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागेल. परंतु, त्यानंतर एमएस धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जोडीने नाबाद शतकीय भागीदारी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

भुवनेश्वर कुमार दिला आठवणींना उजाळा
मंगळवारी झालेल्या सामनाही काहीसा याच प्रकारे झाला. त्यामुळे सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत भुवनेश्वर कुमार म्हणाला की, “या सामन्यात देखील तीच परिस्थिती होती, जी २०१७ च्या पल्लेकेले वनडे सामन्यात होती. आम्ही शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करण्याचा विचार केला होता. आम्ही अधिकाधिक वेळ फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. दोघांनी (दीपक आणि भुवनेश्वर) कुठलाही दबाव घेतला नव्हता. आम्ही परिस्थितीनुसार फलंदाजी करत होतो. दीपक चाहरने आवश्यक रन रेट वाढू दिला नाही.”

भुवी-चाहरची नाबाद भागीदारी
दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघासमोर २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघातील गोलंदाजांनी भारतीय संघातील मुख्य फलंदाजांना लवकर माघारी धाडले होते. भारताने १९३ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे असे वाटू लागले होते की, श्रीलंका संघ या सामन्यात एकहाती विजय मिळवणार. परंतु, शेवटी दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जोडीने ८४ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला सामना जिंकून दिला. यामध्ये दीपक चाहरने ६९ धावांचे योगदान दिले तर, भुवनेश्वर कुमारने १९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले.

महत्त्वाच्या बातम्या –

रोहित शर्मा पहिल्यांदाच बनणार कसोटी कर्णधार? ‘हे’ आहे कारण

भावा, करुन दाखवलंस! दीपक चाहरचा विजयी चौकार बहिणीने केला कॅमेऱ्यात कैद; काढले गौरवोद्गार

भारतीय संघाच्या विजयानंतर ‘गुरू’ राहुल द्रविड भलतेच खुश, ‘या’ शब्दात केले खेळाडूंचे कौतुक; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---