---Advertisement---

भारतीय संघाच्या विजयानंतर ‘गुरू’ राहुल द्रविड भलतेच खुश, ‘या’ शब्दात केले खेळाडूंचे कौतुक; पाहा व्हिडिओ

---Advertisement---

मंगळवारी (२० जुलै) आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील युवा खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत श्रीलंका संघावर ३ गडी राखून विजय मिळवला आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी युवा खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले आहे.

श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या मर्यादीत षटकांच्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांना देण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे खेळाडूंचे प्रदर्शन पाहून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड भलतेच खुश झाले आहेत. सामना झाल्यानंतर राहुल द्रविड यांनी संघातील खेळाडूंचे कौतुक केले आहे, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

काय म्हणाले राहुल द्रविड?
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड यांनी म्हटले की, “या सामन्याच्या योग्य निकाल लागला. या सामन्याचा निकाल लागला नसता तरी ही लढत खूप महत्वाची होती. तुम्ही सर्वांनी अप्रतिम कामगिरी केली.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “ही व्यक्तिगत कामगिरीबाबत चर्चा करण्याची वेळ नाही. आपण याबाबतीत बैठकीत चर्चा करू. परंतु, जर तुम्ही संपूर्ण सामन्यात पाहिलत तर, खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. गोलंदाजांनी ही चांगली कामगिरी केली. सुरुवातीला फलंदाजी करताना फलंदाज अडचणीत आले, परंतु, ज्याप्रकारे शेवट केला आहे. ही एक उत्कृष्ट सांघिक कामगिरी होती.”

द्रविड पुढे म्हणाले की, “पहिल्या वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर श्रीलंका संघाने जोरदार पुनरागमन केले. परंतु, भारतीय संघाने यजमानांनी दिलेल्या आव्हानाला चॅम्पियनसारखे प्रत्युत्तर दिले. विपक्षी संघाचाही सन्मान करायला हवा. सर्व खेळाडूंवर मला अभिमान आहे.”

https://twitter.com/BCCI/status/1417703381028675584

या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना २७५ धावा केल्या होत्या. त्यानंतर २७६ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने १९३ धावांवर ७ गडी गमावले होते. त्यानंतर दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी मिळून भारतीय संघाला ३ गडी राखून विजय मिळवून दिला. चाहरने नाबाद ६९ धावांची खेळी केली, तर भुवनेश्वर कुमारने १९ धावा केल्या होत्या. दोघांनी नाबाद ८४ धावांची भागीदारी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेविरुद्ध रोमांचक विजयानंतर टीम इंडियाची हॉटेलमध्ये रंगली ‘संगीत मैफील’, व्हिडिओ प्रचंड व्हायरल

धोनीने लिहिली धवनसेनेच्या वनडे मालिका विजयाची गाथा! भुवनेश्वर अन् दिपकला ‘असे’ केले तयार

स्टार्क-हेजलवुडने विणले ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे जाळे; विंडीजचा पहिल्या वनडेत १३३ धावांनी लाजिरवाणा पराभव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---