मँचेस्टर। आज(16जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आयसीसी 2019 विश्वचषकात 22 वा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 336 धावा केल्या आहेत आणि पाकिस्तान समोर विजयासाठी 50 षटकात 337 धावांचे आव्हान दिले आहे.
पण भारताला 336 धावांचे रक्षण करताना एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्याने आज केवळ 2.4 षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 8 धावा दिल्या.
परंतू तो जेव्हा त्याचे तिसरे षटक टाकत होता, तेव्हा त्याच्या मासपेशींमध्ये ताण जाणवू लागला होता. अखेर तो या षटकातील चौथा चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजी थांबवून मैदानाबाहेर गेला. त्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंगरुममधून माहिती देण्यात आली की तो उर्वरित सामन्यातून बाहेर पडला आहे.
त्याचे षटक अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकरने पूर्ण केले. विशेष म्हणजे विजय शंकरने हे षटक पूर्ण करताना पहिल्याच चेंडूवर इमाम उल हकला बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले.
तत्पूर्वी या सामन्यात भारताकडून रोहित शर्माने 140 धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर केएल राहुलने 57 आणि विराट कोहलीने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताला 336 धावांचा डोंगर उभा करता आला. तसेच पाकिस्तानकडून मोहम्मद अमिरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टॉप १०: हिटमॅन रोहित शर्माने शतकी खेळीबरोबरच केले हे खास १० विक्रम
–विश्वचषक २०१९: किंग कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये रचला मोठा इतिहास!
–तिकीटांची मागणी करणाऱ्या चाहत्यांना विराट कोहलीने दिला मजेशीर संदेश, पहा व्हिडिओ