---Advertisement---

पुजारा विरुद्ध भारतीय संघात रचला जातो कट, संघाबाहेर असलेल्या खेळाडूने केला खुलासा

On: शनिवार, जून 27, 2020 12:04 PM
---Advertisement---

मुंबई । भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजारा हा खेळपट्टीवर टिकून मोठी खेळी करण्यात माहीर आहे. तो भारतीय कसोटी संघातला महत्वाचा खेळाडू आहे. खेळपट्टीवर एकदा त्याने जम बसवला की त्याला बाद करणे गोलंदाजांना अवघड जाते. विरोधी संघातले खेळाडू त्याला बाद करण्यासाठी वेगवेगळे नियोजन करतातच.  याशिवाय भारतीय गोलंदाज देखील पुजाराला फलंदाजीचा सराव करताना त्रास देण्याचा कट रचायचे, याचा खुलासा खुद्द भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने सोशल मीडियावर केला आहे.

भुवनेश्वर कुमारने सोशल मीडियावर जो फोटो शेअर केला आहे, त्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह एका गंभीर मुद्द्यावर चर्चा करत करत असताना दिसून येत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये भुवनेश्वरने लिहिले की, “थ्रोबॅक. त्या दिवशी आम्ही चेतेश्वर पुजाराला सतत बाऊन्सर चेंडू टाकत त्याच्यावर आक्रमण करण्याचा कट करत होतो.”

https://twitter.com/BhuviOfficial/status/1276131572027031553

पुजाराने देखील भुवनेश्वर कुमारच्या या ट्विटला उत्तर दिले की, “किती थकवणारा हा अनुभव असेल, त्या दिवशी मी या गोलंदाजी आक्रमणाला सोडून गेलो.” पुजाराने हे उत्तर देताना भुवनेश्वरसाठी मास्टरमाईंड हे हॅस्टॅग देखील वापरले आहे.

https://twitter.com/cheteshwar1/status/1276163094541152258

यावर फॅन्स प्रतिक्रिया दिली आहे की, पुजाराला ट्रोल करणे खूपच अवघड आहे.

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटपटू गेले अनेक दिवस सरावापासून दूर आहेत. भारताचा कसोटी संघातील नियमित सदस्य चेतेश्वर आणि सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकट यांच्यासह यामोसमाचा रणजी विजेत्या सौराष्ट्र संघातील खेळाडूंनी तीन महिन्यांनंतर नेटमध्ये सराव करण्यास सुरुवात केली. रणजी चषक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच संघातील खेळाडू सरावासाठी मैदानात उतरले होते.

ट्रेंडिंग घडामोडी – 

असा बनला कचरा वेचणारा मुलगा जगातील सर्वात खतरनाक फलंदाज, आज ओळखला जातो षटकार किंग

विंडीजच्या गोलंदाजांचं यश डोळ्यात खुपल्याने ‘बाउन्सर’ नियम; विंडीजच्या माजी खेळाडूचा दावा

बीसीसीआयने पीसीबीला दिलं चोख प्रत्युत्तर; म्हणतात, “कोणत्याही प्रकारचे दहशतवादी…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---