भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषक स्पर्धेत रविवारी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असून सर्वजण सराव सत्रात घाम गाळत आहेत. आशिया चषकात गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतासाठी जबरदस्त कामगिरी करू शकत होता, पण दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. असे असले तरी, भारतीय संघाकडे बुमराहची कमी भरून काढण्यासाठी एक अनुभवी वेगवान गोलंदाज आहे.
बुमराहची कमी भरून काढेल हा गोलंदाज
निवडकर्त्यांनी आशिया चषक २०२२ (Jasprit Bumrah) हंगामासाठी जो संघ निवडला आहे, त्यामध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याला सामील केले गेले आहे. डावाच्या सुरुवातील भुवनेश्वर विरोधी संघासाठी घातक ठरू शकतो. नव्या चेंडूने विकेट्स मिळवण्याची कला त्याला चांगल्या पद्धतीने अवगत आहे. तसेच स्विंग चेंडू टाकण्यातही तो महीर आहे. संथ गतीच्या चेंडूवर भल्या-भल्या फलंदाजांना भुवनेश्वर पाणी पाजू शकतो. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा अनुभव देखील आहे, जो आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या कामी येईल.
भुवनेश्वर कुमारने मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकानंतर एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटला अधिक प्राधान्य दिल्याचे दिसले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. त्याचा चार षटकांचा कोटा सामन्याची दिशा पूर्णपणे पालटवू शकतो. त्याचे यापूर्वीचे प्रदर्शन आणि आकडेवारी पाहता तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा सर्वांना आहे.
भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला –
भुवनेश्वरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने एकूण २१ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ६३ विकेट्स घेतल्या. १२१ एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळलेल्या ७२ सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे १४१ आणि ७३ विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वरव्यतिरिक्त आशिया चषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात अर्शदीप सिंग आणि आवेश खान या वेगवान गोलंदाजांना संधी दिली गेली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हात हलका रखना, हमारे बॉलर नयें है’, पाकिस्तानी चाहत्याची ‘हिटमॅन’ला कळकळीची विनंती
VIDEO: आशिया चषकाच्या उद्घाटनासाठी राशिदचा ‘स्नेक’ तयार; खास शॉटचा करतोय सराव
पाकिस्तानची खैर नाही! आशिया चषकासाठी भारताने १० महिन्यांपूर्वीच बनवून ठेवलेला ‘हा’ मास्टरप्लॅन