मुंबई | आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या.
१७९ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या चेन्नईसाठी सुरुवात मात्र अतिशय खराब राहिली. त्यांना पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव करता आली नाही.
सनरायझर्स हैद्राबादच्या भुवनेश्वर कुमारने पहिले षटक चक्क निर्धाव टाकले. स्फोटक फलंदाज शेन वाॅटसनला या ओव्हरमध्ये भुवीला एकही धाव घेता आली नाही.
त्याने या सामन्यात पहिले १० चेंडू देखील निर्धाव टाकले. पहिल्या ३ षटकांत त्याने केवळ ९ धावा दिल्या आहेत.
याबरोबर भुवीच्या नावावर एक खास विक्रम जमा झाला. मखाया अन्टिनी, रायन हॅरीस आणि आर अश्विननंतर आयपीएल फायनलमध्ये निर्धाव षटक टाकणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे.
आयपीएल फायनलमध्ये निर्धाव षटक टाकणारे गोलंदाज
मखाया न्टीनी (चेन्नई, २००८)
रायन हॅरीस (डेक्कन, २००९)
आर. अश्विन (चेन्नई, २०१०)
भुवनेश्वर कुमार (हैद्राबाद, २०१८)#IPLFinal @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi— Sharad Bodage (@SharadBodage) May 27, 2018
Bhuvi's bowling figures right now 3-1-9-0 #VIVOIPL #CSKvSRH pic.twitter.com/mECNbMPCKr
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–जेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप झाली पक्की
-सचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला
–लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी




