सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगचा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेत रोज काही ना काही नवीन घडताना दिसून येत आहे. त्यामुळे हे पाहून चाहते दंग झाले आहेत. कारण या स्पर्धेत रोज एका पेक्षा एक सरस झेल घेताना खेळाडू दिसून येत आहेत. त्याचबरोबर खेळाडू आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना बघायला मिळत आहे. मात्र सोमवारी ब्रिस्बेन हिट आणि सिडनी थंडर यांच्यात एक घटना अशी घडली की,त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ब्रिस्बेन हिट आणि सिडनी थंडर यांच्यात सोमवारी सामना खेळला गेला. या सामन्यात सिडनी थंडर संघाचा खेळाडू क्रिस ग्रीनने क्षेत्ररक्षण करताना एक सोपा झेल सोडला आणि हा चेंडू षटकार गेला. उल्लेखनीय म्हणजे या खेळाडूच्या हाताचा चेंडूला स्पर्श सुद्धा झाला नाही आणि या खेळाडूने डोळे झाकले. ही घटना पाहून समालोचक, फलंदाज आणि चाहते चकीत झाले.
क्रिस ग्रीनने सोडला सोपा झेल
ही घटना ब्रिस्बेन हिट संघाच्या डावातील आहे. सिडनी थंडर संघाचा तनवीर संघा हा लेग स्पिनर 15 व्या षटकात गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर डेनली या फलंदाजाने स्लॉग स्विप फटका मारला. हा चेंडू मिड विकेटवर उभा असलेल्या क्रिस ग्रीनकडे गेली. सगळ्याना वाटत होते की, हा सोपा झेल पकडला जाईल. मात्र क्रिस ग्रीनने अचानक या चेंडूवरुन असलेली नजर हटवली आणि डोळे झाकले.
त्यामुळे हा चेंडू षटकार गेला. त्याचबरोबर डेनली या फलंदाजाला जीवनदान मिळाले. क्रिस ग्रीनला अचानक चेंडूवरून नजर हटवताना बघून सर्व चकीत झाले. मात्र त्यानंतर काही वेळानंतर त्याने डोळे झाकण्याचे कारण स्पष्ट झाले. जेव्हा क्रिस ग्रीन झेल घेण्याचा प्रयत्न करता होता, तेव्हा त्याच्या डोळ्यावर स्टेडियममधील प्रकाश पडला. त्यामुळे त्याने डोळे झाकले आणि चेंडू षटकारसाठी गेला. यामुळे आता क्रिस ग्रीन याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
The worst feeling, Chris Green loses it in the lights #BBL10 pic.twitter.com/FQCeDTvOjp
— 7Cricket (@7Cricket) January 4, 2021
ब्रिस्बेन हिट संघाने जिंकला सामना
या घटनेनंतर हा सामना ब्रिस्बेन संघाने 5 विकेट्सने जिंकला. सिडनी थंडर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानी 20 षटकात 8 विकेट्स गमावून 174 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हिट संघाने 19.1 षटकात 5 गडी गमावून 175 धावा करत हा सामना 5 विकेट्सने जिंकला. ब्रिस्बेन संघाकडून जो बर्न्स 52 आणि डेनली याने 50 धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीत शुन्यावर बाद होणं महापाप! ‘या’ तीन आशियायी फलंदाजांनी तर सलग तीन डावात केलंय हे काम
निकाल तर शंभर टक्के लागणार, परंतू पाहा काय आहे श्रीलंका-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याची सद्यस्थिती
चालू कसोटी सामन्याच्या शेजारी चिमुकल्यांनी मांडला क्रिकेटचा डाव, फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ