ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग 2022-23 स्पर्धेत फलंदाज एकापेक्षा एक फटके मारून प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडताना दिसत आहेत. काही फलंदाजांचे विचित्र फटके असे आहेत, जे कदाचित कधीच पाहायला मिळाले नसतील. असाच एक फलंदाज या लीगमधील एका सामन्यात शॉट मारताना दिसला. त्याचा हा शॉट कदाचित सूर्यकुमार यादव आणि एबी डिविलियर्स यांचेही फटके विसरायला भाग पाडेल. त्याचा व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहे.
रविवारी (दि. 22 जानेवारी) बिग बॅश लीग 2023 (Bigg Bash League) स्पर्धेतील 51व्या सामन्यात ब्रिस्बेन हीट (Brisbane Heat) संघाने मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) संघाला 4 धावांनी पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिस्बेन संघाने 4 विकेट्स गमावत 188 धावा चोपल्या होत्या. यावेळी ब्रिस्बेन संघाच्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मेलबर्न संघाला 3 विकेट्स गमावत 184 धावाच करता आल्या. त्यामुळे या ब्रिस्बेनने हा सामना 4 धावांनी खिशात घातला.
या सामन्यात हाँगकाँग क्रिकेट संघाचा (HongKong Cricket Team) फलंदाज सॅम हेन (Sam Hain) बीबीएलमध्ये ब्रिस्बेन संघाकडून खेळतोय. त्याने धमाकेदार खेळी केली. तसेच, सर्व गोलंदाजांविरुद्ध धावा चोपल्या.
सॅम हेनचा जबरदस्त फटका
ब्रिस्बेन हीट संघाचा कर्णधार उस्मान ख्वाजा याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 20 धावसंख्येवर मार्नस लॅब्युशेन आणि जोश ब्राऊन यांसारख्या फलंदाजांनी विकेट गमावली. यानंतर कर्णधार ख्वाजासोबत रेनशॉ याने डाव सांभाळला, पण तोही 47 धावसंख्येवर तंबूत परतला. एका बाजूने डाव सांभाळत कर्णधार ख्वाजाही 55च्या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर ब्रिस्बेनने एकही विकेट गमावली नाही. कारण, सॅमने जिमी पीयरसन याच्यासोबत भागीदारी रचत संघाला मोठी धावसंख्या करून दिली. यादरम्यान सॅमने 4 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पाडला. त्याने डावादरम्यान 41 चेंडूंचा सामना करताना 73 धावा चोपल्या. पीयरसनने नाबाद 57 धावांचे योगदान दिले. यादरम्यान सॅमने एक शॉट असा मारला, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. सॅमच्या षटकाराचा व्हिडिओ ब्रिस्बेन हीट संघाने शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CntJu3dIhQu/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
या विजयासह ब्रिस्बेन संघाने हंगामातील 6वा सामना नावावर करत प्लेऑफच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले. दुसरीकडे मेलबर्न संघाचा हा या हंगामातील 10वा पराभव होता. या सामन्यात स्टार्स संघाने संघर्ष केला, परंतु त्यांना आव्हान पार करता आले नाही. (big bash league 2022-23 sam hain smashed 4 sixes 7 fours against spinner adam zampa melbourne stars)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो मोठा खेळाडू, पण क्रिकेट कुणासाठी…’, बुमराहच्या पुनरागमनाच्या प्रश्नावर शमीचे मोठे भाष्य
पुजाराला ‘हा’ गोलंदाज वाटतो सर्वोत्तम! आजवर अनेकदा ठरलाय त्याचाच शिकार