---Advertisement---

जसप्रीत बुमराह सोबत झाला गुलीगत धोका, इंग्लंड दौऱ्यापूर्वीच मिळाली वाईट बातमी

On: रविवार, मे 11, 2025 12:49 PM
---Advertisement---

भारतीय संघाला पुढच्या महिन्यात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठी खेळाडू इंग्लंडचा दौरा करतील. याआधी रोहित शर्माने या फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर बीसीसीआय त्याच्या ठिकाणी खेळाडू शोधत आहेत. यामध्ये चर्चा होत आहेत की, जसप्रीत बुमराहला नवा कसोटी कर्णधार बनवले जाऊ शकते. परंतु याविषयी एक मोठी अपडेट आता समोर येत आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या खराब प्रदर्शनानंतर भारतीय निवडकर्ते नव्या कर्णधाराच्या शोधात आहेत. म्हटले जात होते की, जसप्रीत बुमराहकडे ही भूमिका सोपवण्यास दिली जाऊ शकते. परंतु नवीन रिपोर्ट नुसार, बीसीसीआय शुबमन गिलकडे ही जबाबदारी सोपवू शकते. जर असे झाले तर, जसप्रीत बुमराहला उपकर्णधार नाही बनवले जाणार. जसप्रीत कर्णधार नाही बनला तर तो उपकर्णधार बनण्याचा प्रश्नच येत नाही.

बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले की, फिटनेसच्या समस्येच्या कारणाने भारतीय निवडकर्ते जसप्रीत बुमराहला कर्णधार पद देऊ इच्छित नाहीत. हे खरे आहे की, निवडकर्त्यांनी इंग्लंड मालिकेसाठी विराटला कर्णधार बनवण्याचा विचार केला होता. यामुळे गिलला कर्णधार पदाची भूमिका निभावण्यासाठी थोडा वेळ मिळेल. बुमराहच्या फिटनेस समस्यांमुळे अजित आगरकर समितीची निवड शुबमन गिल ठरू शकतो.

रोहित शर्मा नंतर कसोटी क्रिकेटचा कर्णधार शुबमन गिलला कर्णधार बनवले जाऊ शकते. तसेच उपकर्णधार पदाची भूमिका युवा फलंदाज विकेटकीपर रिषभ पंतला दिली जाऊ शकते. परंतु बीसीसीआयने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. के एल राहुलचे वय 33 पेक्षा जास्त असल्याने के एल राहुलला सुद्धा ही जबाबदारी मिळणे कठीण आहे. 23 मे रोजी नवीन कर्णधाराच्या घोषणेसाठी बीसीसीआयने पत्रकार परिषद आयोजित केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---