महमुदुल्लाहला सोमवारी(24 जून) बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात झालेल्या सामन्यादरम्यान पोटरीची दुखापत झाली आहे. बांगलादेशने 64 धावांनी विजय मिळवलेल्या या सामन्यात त्याला फलंदाजी करताना एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात ही दुखापत झाली आहे. यावेळी त्याच्या पोटरीवर बांगलादेशचे फिजिओ थिहान चंद्रमोहन यांनी कंप्रेशन टेप लावली होती.
या दुखापतीनंतरही महमुद्दुलाहने त्याची फलंदाजी कायम केली होती. त्याने या सामन्यात 27 धावा करताना मुशफिकूर रहिमबरोबर पाचव्या विकेटसाठी 56 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती.
पण त्यानंतर तो या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी उतरला नव्हता. तसेच त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले होते. या स्कॅनमध्ये त्याला ग्रेड 1 ची पोटरीची दुखापत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याच्या भारताविरुद्धच्या सामन्यातील उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
त्याच्या दुखापतीबद्दल थिहान चंद्रमोहन म्हणाले, ‘महमुद्दुलाहला पोटरीची छोटी दुखापत झाली आहे. आम्ही त्याच्या दुखापतीतून सावरण्याच्या प्रगतीवर पुढील काही दिवस लक्ष ठेवू. ज्यावर पुढील सामन्यातील त्याची उपलब्धता अवलंबून आहे.’
बांगलादेशच्या उपांत्यफेरीत प्रवेश करण्याच्या आशा अजून जिवंत आहेत. त्यांचे साखळी फेरीतील उर्वरित सामने भारत आणि पाकिस्तान विरुद्ध होणार आहेत. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी बांगलादेशला या दोन्ही सामन्यात विजय आवश्यक असणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मिशेल स्टार्कच्या या दबरदस्त यॉर्करने स्टोक्स झाला क्लीन बोल्ड! पहा व्हिडिओ
–अशी आहेत विश्वचषक २०१९च्या सेमीफायनलमध्ये राहिलेल्या ३ जागांसाठीची समीकरणं
–टीकाकारांचा धनी ठरलेल्या धोनीच्या मदतीला आला त्याचाच पहिला कर्णधार





