---Advertisement---

IND vs ENG: दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का! ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत

On: बुधवार, जून 25, 2025 7:08 PM
---Advertisement---

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’च्या पहिल्या कसोटीत भारताला 5 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतासाठी 5 फलंदाजांनी शतके झळकावली, पण तरीही भारतीय संघ जिंकू शकला नाही. आता दोन्ही संघ बर्मिंगहॅममध्ये मालिकेतील दुसरा सामना खेळणार आहेत. तत्पूर्वी या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. रिपोर्टनुसार, डावखुरा फलंदाज साई सुदर्शन ज्याने हेडिंग्ले कसोटीत पदार्पण केले होते, तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. (Sai Sudharsan Injury Update)

‘रेव्हस्पोर्ट्स’च्या (RevSports) रिपोर्टनुसार, साई सुदर्शन कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी दुखापतग्रस्त झाला होता. तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. शेवटच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना तो काही अडचणीत दिसला. त्याच्या खांद्यात थोडी अडचण आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अजून एक आठवडा बाकी आहे आणि भारतीय फलंदाजांना सावरण्यासाठी पुरेसा वेळ आहे. पण, त्याला ही दुखापत कशी झाली आणि ती किती गंभीर आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही. परंतु, जर तो वेळेवर तंदुरुस्त झाला नाही, तर नीतीश कुमार रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते किंवा सुदर्शनच्या जागी अभिमन्यू ईश्वरन येऊ शकतो. (Nitish Kumar Reddy Playing XI)

साई सुदर्शन हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात खाते न उघडताच तंबूत परतला होता. तर दुसऱ्या डावात तो फक्त 30 धावा करून बाद झाला. त्याची ही कामगिरी अशा खेळपट्टीवर आली, जी फलंदाजांसाठी ‘स्वर्गासारखी’ होती. पहिल्या डावात बेन स्टोक्सने त्याला शून्यावर बाद केले होते. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याला बेन स्टोक्सने पॅव्हेलियनलचा रस्ता दाखवला.

पहिल्या कसोटीत युवा शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यान संघाची गोलंदाजी, तसेच फिल्डींग यावर अनेक क्रिकेट तज्ञांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सामन्यात 5 भारतीय फलंदाजांनी शतके झळकावली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कशा प्रकारे पुनरागमन करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (India vs England 2nd Test)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---