---Advertisement---

राजस्थान आणि कोलकाता संघाची चिंता शिगेला, ‘हे’ खेळाडू उर्वरित हंगामातून माघार घेण्याच्या तयारीत!

On: मंगळवार, मे 4, 2021 12:36 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. राजस्थान रॉयल्स संघाला आतापर्यंत मोठमोठे धक्के बसले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीलाच जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे बाहेर झाला होता. तसेच बेन स्टोक्सने देखील माघार घेतली होती. अशातच राजस्थान रॉयल्स संघाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. संघातील महत्वाचा खेळाडू आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेणार आहे. यासोबतच कोलकाता नाईट रायडर्स संघाला देखील मोठा धक्का बसणार आहे.

या हंगामात अनेक परदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत लियाम लिविंगस्टोन, केन रिचर्ड्सन, ॲडम झंपा या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी स्पर्धेला टाटा बाय बाय केले आहे. तसेच राजस्थान रॉयल्स संघांतून मुस्ताफिजुर रहमान आणि कोलकाता नाईट रायडर्स संघातून शाकीब अल हसन हे दोघेही माघार घेणार असल्याचे समजत आहे. बांगलादेश संघाला येत्या २३ मे पासून श्रीलंका संघाविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. हे सामने २३, २५ आणि २७ मे रोजी खेळवण्यात येणार आहेत.

बांगलादेश सरकारने भारत आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांसाठी १४ दिवस विलागिकरणात राहण्याचे आदेश दिले आहेत. क्रीकबजने दिलेल्या माहितीनुसार, मुस्ताफिजुर रहमान आणि शाकिब अल हसन यांना दिलेल्या वेळेच्या आधीच बांगलादेशमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. यापूर्वी हे दोघेही १९ मे पर्यंत आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी उपलब्ध राहणार होते. त्यानंतर ३ दिवस विलागिकरणात राहून, ते श्रीलंका संघाविरुद्ध वनडे मालिका खेळणार होते. बांगलादेशच्या आरोग्य विभागाने भारतातील कोरोनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे हा नियम कठोर केला आहे.

मुस्ताफिजुर रहमानने राजस्थान रॉयल्स संघासाठी आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने चेतन सकारियासोबत मिळून संघासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुस्ताफिजुर रहमानने ४ षटकात अवघ्या २० धावा खर्च करत ३ गडी बाद केले होते. तर शाकीब अल हसनला या हंगामात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सर सचिन, लारा, गॅरफिल्ड की रिचर्डसन, कोण घेणार आहे वॉर्नरची जागा?’ माजी भारतीय दिग्गज संतापला

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! घरी परतलेल्या अश्विनचे होणार पुनरागमन, ‘या’ दिवशी येण्याची शक्यता

आयपीएलला कोरोनाने घेरले; बीसीसीआयने तयार केला बॅकअप प्लॅन, ‘या’ शहरात होतील पुढील सामने?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---