रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील पहिला सामना आपल्या नावे केला. आरसीबीने मुंबई इंडियन्ससारख्या तगड्या संघाला 8 विकेट्सने पराभूत करत हंगामाची विजयी सुरुवात केली. या विजयात सिंहाचा वाटा उचलण्याचे काम विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी केले. पहिल्या विजयानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये तुफान जल्लोष साजरा करण्यात आला. या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.
RCB v MI: Dressing Room Victory Celebration
Captain Faf leads from the front off the field as well, as the team prepares to bring finesse into the team song. Here’s more from last night’s win against MI.#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 pic.twitter.com/h8JnkaIn97
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 3, 2023
मुंबईने विजयासाठी दिलेल्या 172 धावांचे आव्हान पार करताना विराट व प्लेसिस अनुभवी जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना कोणतीही संधी न देता एकतर्फी विजय साकारला. संघाच्या याच विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये मोठे सेलिब्रेशन करण्यात आले. आरसीबीच्या सोशल मीडिया हँडलवर आठ मिनिटांचा एक मोठा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. यामध्ये सुरुवातीला प्लेसिस व डेव्हिड विली हे संघाचे अँथम सॉंग गाताना दिसले. इतकेच नव्हे तर प्लेसिसने विराटला उचलून देखील घेतले. या विजयानंतर सर्व खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्स गमावत 171 धावा केल्या होत्या. यामध्ये तिलक वर्मा याच्या सर्वाधिक नाबाद 84 धावांचा समावेश होता. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने 16.2 षटकात 2 विकेट्स गमावत 172 धावा केल्या आणि 8 विकेट्सने विजय साकारला. या विजयात विराटने 49 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. तर फाफने 43 चेंडूत 73 धावांचे योगदान दिले. कर्णधार प्लेसिसला सामनावीर म्हणून घोषित केले गेले. आरसीबीला आपला पुढील सामना 6 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कोलकाता येथे खेळायचा आहे.
(Big Celebration In RCB Dressing Room After Win Over Mumbai Indians In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023बाबत ख्रिस गेलची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ 4 संघ करतील प्लेऑफमध्ये एन्ट्री, RCBची हाकालपट्टी
अशी ताकद लावायची! दिग्गज विराटकडून युवा फलंदाज तिलक अन् नेहालला खास टिप्स, फोटो जोरदार व्हायरल