---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अपयशानंतर PCBचा मोठा निर्णय – पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाला दाखवला घरचा रस्ता!

On: मंगळवार, फेब्रुवारी 25, 2025 7:30 PM
---Advertisement---

पाकिस्तान संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत अतिशय लाजिरवाणी कामगिरी केली आहे. त्यांच्या घरेलू मैदानात न्यूझीलंड संघाकडून पाकिस्तान 60 धावांनी पराभूत झाला. त्यानंतर भारतीय संघाने त्यांना 6 विकेट्सने पराभूत केले. दोन्ही संघाकडून पराभूत झाल्यामुळे पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या बाहेर पडला आहे. स्पर्धेच्या पाच दिवसात यजमान संघ पाकिस्तान सेमीफायनल सामन्यातून सुद्धा बाहेर पडला आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, पराभूत झाल्यामुळे निराश असलेल्या पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाने पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक आकीब जावेद यांना प्रशिक्षक पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत खराब प्रदर्शन करून आणि गटातूनही बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान संघावर टीकांचा भडीमार होत आहे. पाकिस्तान संघाच्या माजी खेळाडूंनी प्रशिक्षकांवर तसेच संघ निवडकर्त्यांवर सुद्धा आरोप केले आहेत.

आकिब जावेद यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गेल्या वर्षी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. तेव्हा गैरी कर्स्टनला प्रशिक्षक पदावरून हटवण्यात आले होते. पीसीबीने एका सूत्रांकडून सांगितले की, पाकिस्तान बोर्डाने अजून ठरवले नाही की,‌ पाकिस्तान संघाचे वेगवेगळे प्रशिक्षक असतील. मात्र हे नक्की आहे की,‌ चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब प्रदर्शनामुळे आत्ता जो संघाचा प्रशिक्षक स्टाफ आहे त्यामध्ये बदल होणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघासाठी मागील काही वर्ष खूप आव्हानात्मक राहिली आहेत. संघासाठी वेगवेगळे प्रशिक्षक, निवडकर्ते बदलण्यात आले आहेत. क्रिकेट बोर्डासमोर आता मोठ आव्हान असणार आहे की, प्रशिक्षकाच्या ठिकाणी कोणाची नियुक्ती करावी.

पण ज्या प्रकारे पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने मागच्या वर्षी प्रशिक्षक आणि निवडकर्ते बदलले आहेत, आता या पदांसाठी योग्य व्यक्ती निवडणे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेमध्ये काहीही चांगलं झालं नाही. ना पाकिस्तान संघाने चांगली फलंदाजी केली, ना चांगली गोलंदाजी केली. पाकिस्तानच्या खराब फलंदाजीचा अंदाजा यावरूनच लावता येईल की दोन सामन्यांमध्ये खुशदिल शाहने पाकिस्तान संघासाठी 107 धावा केल्या आहेत. आणि तोच त्यांचा बेस्ट स्कोरर आहे.

हेही वाचा 

विराटचा आदर्श सचिन, बाबरचा खेळ सुस्त – शोएब अख्तरचा जोरदार हल्लाबोल!

“विराट कोहली सर्वकालीन महान वनडे खेळाडू” इंग्लंडच्या माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य

“सेमीफायनलपूर्वी महाभारत! भारताच्या सामन्यावर ठरेल तीन संघांचे भविष्य”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---