Ahmed Shehzad Retired from PSL: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा 32 वर्षीय खेळाडू अहमद शहजाद याने मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी (दि. 13 डिसेंबर) पाकिस्तान सुपर लीग 2024चा ड्राफ्ट पार पडला. यादरम्यान 6 फ्रँचायझींनी अनेक मोठ्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील केले. मात्र, शहजादवर कुणीच विश्वास न दाखवल्यामुळे त्याने आता मोठा निर्णय घेत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अहमद शहजाद पीएसएलमधून निवृत्त
फलंदाज अहमद शहजाद (Ahmed Shehzad) याच्यावर पीएसएल 2024 ड्राफ्टमध्ये कोणत्याच संघाने बोली लावली नाही. त्यामुळे अहमद शहजाद पाकिस्तान सुपर लीगमधून निवृत्त (Ahmed Shehzad Retired from the Pakistan Super League) झाला. त्याने शुक्रवारी (दि. 15 डिसेंबर) अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून ट्वीट करत ही माहिती दिली.
भली मोठी पोस्ट लिहीत तो म्हणाला, “पाकिस्तान सुपर लीगला मनापासून अलविदा! मी ही नोट लिहीत आहे, जी मला वाटले की मी या वर्षी लिहिणार नाही. आणखी एक पीएसएल ड्राफ्ट पुढे गेला आणि पहिले पाढे पंच्चावन्न. मला निवडले नाही, का ते देवालाच माहिती.”
A heartfelt goodbye! pic.twitter.com/7NdjpCXjeR
— Ahmad Shahzad 🇵🇰 (@iamAhmadshahzad) December 15, 2023
त्याने पुढे असेही म्हटले की, “मागील काही वर्षांमध्ये मी सतत देशांतर्गत क्रिकेटमध्ये पूर्ण योगदान देण्याचे प्रयत्न केले आहेत. आणि पीएसएलच्या ड्राफ्टपूर्वी नॅशनल टी20 चषकात चांगली कामगिरी केली आहे. फ्रँचायझींनी माझ्यापेक्षा कमी चांगली कामगिरी करणाऱ्या इतर खेळाडूंना निवडले. अशात मला बाहेर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मात्र, जेव्हा सर्व काही पूर्वनियोजित असते, तेव्हा काही फरक पडत नाही.”
अहमदची कारकीर्द
अहमद शहजाद याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्याने पाकिस्तानकडून आतापर्यंत 13 कसोटी, 81 वनडे आणि 59 टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 982 धावा, वनडेत 2605 धावा आणि टी20त 1471 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण 10 आंतरराष्ट्रीय शतकेही आहेत. (big news Ahmed Shehzad has retired from the Pakistan Super League for this reason know here)
हेही वाचा-
INDvsSA: वर्ल्डकपमधील फिल्डिंग मेडलचे कमबॅक, पण यावेळी दिसला नवा अंदाज; कोण बनला मानकरी? पाहा Video
DRS Controversy: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाची फसवणूक? अपील करूनही अंपायरने दिला नाही डीआरएस, वाचा का?