क्रिकेटविश्वात जेवढे महत्त्व खेळाडूंना असते, तेवढेच महत्त्वाचे पंचदेखील असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम आणि महागड्या पंचांमध्ये सामील असणाऱ्या एका पंचाविषयी मोठी बातमी समोर येत आहे. ते पंच इतर कुणी नसून पाकिस्तानचे अनुभवी पंच अलीम दार आहेत. त्यांनी पंचांच्या आयसीसी एलिट पॅनेलमधून राजीनामा दिला आहे. यासोबतच त्यांची अंपायरिंगमधील उल्लेखनीय कारकीर्दही संपुष्टात आली आहे. 54 वर्षीय दार यांनी 19 वर्षे पॅनेलचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या नावावर पुरुषांच्या 435 आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचाची भूमिका पार पाडण्याचा विक्रम आहे.
अलीम दार (Aleem Dar) यांनी 2007 आणि 2011च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासोबतच 2010 आणि 2012मधील टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही पंचगिरी केली होती.
अलीम दार यांचा ‘पंच’ प्रवास
पाकिस्तानचे माजी खेळाडू राहिलेले अलीम दार (Aleem Dar stepped down from the icc elite panel of Umpires) यांनी सन 2000मधील एका वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पंच म्हणून पदार्पण केले होते. तसेच, आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये स्थान मिळवणारे ते पहिले पंच होते. त्यांनी 144 कसोटी, 222 वनडे आणि 69 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात पंचाची भूमिका साकारली होती. यादरम्यान त्यांनी 5 वेळा 50 षटकांच्या विश्वचषकात आणि 7 वेळा टी20 विश्वचषकात पंचगिरी केली होती. दार हे 2009, 2010 आणि 2011मध्ये डेविड शेफर्ड ट्रॉफी जिंकण्यातही यशस्वी ठरले होते.
अलीम दार यांचे वक्तव्य
आयसीसीशी बोलताना अलीम दार म्हणाले की, “हा एक मोठा प्रवास राहिला आहे. मात्र, मी या प्रवासाच्या प्रत्येक भागाचा आनंद घेतला आहे. मला जगभरात पंचगिरी करण्याचा आनंद आणि सन्मान मिळाला आहे. तसेच, मी जे काही मिळवलंय, त्याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. मात्र, मी आताही एक आंतरराष्ट्रीय पंचाच्या रूपात आपली कारकीर्द कायम ठेवण्यासाठी उत्सुक आहे. मला वाटले की, 19 वर्षांनंतर एलिट पॅनेलमधून दूर जाणे आणि कोणाला तरी संधी देण्याची हीच योग्य वेळ होती. जगभरातील पंचांना माझा संदेश आहे की, कठोर मेहनत करा, शिस्त बाळगून राहा आणि सतत शिकत राहणे कधीही बंद करू नका.”
“मी आयसीसी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पॅनेलच्या आपल्या सहकाऱ्यांना अनेक वर्षांपासूनच्या त्यांच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद देऊ इच्छितो. मी माझ्या कुटुंबालाही धन्यवाद देऊ इच्छितो, ज्यांच्या पाठिंब्यामुळे मी इतका मोठा प्रवास करू शकलो नसतो,” असेही पुढे बोलताना दार म्हणाले.
अलीम दार यांचा पगार
आयसीसीच्या एलिट पॅनेलचे सदस्य राहिलेले पंच अलीम दार यांची गणना महागड्या पंचांमध्ये होते. आता त्यांनी राजीनामा दिला असला, तरीही ते माध्यमांतील वृत्तांंनुसार, कसोटी सामन्यासाठी 3,77,567 रुपये घ्यायचे. तसेच, वनडे सामन्यासाठी 2,26,540 रुपये आणि आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यासाठी 1,13,270 रुपये मानधन घ्यायचे. एवढेच नाही, तर त्यांचा वार्षिक पगार हा तब्बल 75,51,350 रुपये इतका होता.
The number of umpires in the panel has risen up to 12 from 11 👀
Details 👇https://t.co/rl1gaGHbQ4
— ICC (@ICC) March 16, 2023
आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये दोन नवे पंच
अशातच, पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे एड्रियन होल्डस्टॉक आणि पाकिस्तानचे अहसान रझा यांना सामील करण्यात आले आहे. अशाप्रकारे एलिट पॅनेलमध्ये पंचांची संख्या वाढून 12 झाली आहे. (big news aleem dar stepped down from the icc elite panel of umpires)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातने दिला दिल्लीला पराभवाचा धक्का! प्ले-ऑफ्ससाठी जायंट्सच्या आशा कायम
“सीएसकेसह घालवलेली 2 वर्षे कारकिर्दीतील सर्वोत्तम”, भज्जीने दिली खुल्या दिलाने कबुली