क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार याबाबत आशियाई क्रिकेट परिषदेने आधीच घोषणा केली होती. अशात आशिया चषक 2023 स्पर्धेतील सामन्यांच्या वेळा समोर आल्या आहेत. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3 वाजता खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जातील. विशेष म्हणजे, यावेळी आशिया चषक 50 षटकांच्या क्रिकेट प्रकारात खेळले जाईल.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत एकूण 6 संघ भाग घेतील. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. सर्व संघ 3-3च्या दोन गटात विभागले गेले आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघ आहेत. तसेच, ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि गतविजेता श्रीलंका संघ आहेत. स्पर्धा दोन टप्प्यात खेळली जाईल, ज्यात साखळी फेरी आणि सुपर 4 फेरी असेल.
दोन देश यजमानपद भूषवणाऱ्या या स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तान आणि 9 सामने श्रीलंकेत खेळले जातील. पाकिस्तानमध्ये लाहोर आणि मुल्तान शहरांमध्ये सामने होतील. तसेच, श्रीलंकेत 9 सामने कँडी आणि कोलंबो येथे खेळले जातील. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तानच्या लाहोर येथे आणि अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या कोलंबो येथे खेळला जाईल. यादरम्यान पाकिस्तान संघ साखळी फेरीत फक्त एकच सामना घरच्या मैदानावर खेळेल. तसेच, स्पर्धेत 2 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने असतील. (big news asia cup 2023 all match timing revealed know here all details here)
All Asia Cup 2023 matches will be played from 3pm IST. pic.twitter.com/SP7xyTMIVf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 6, 2023
आशिया चषक 2023च्या वेळा आणि ठिकाण
30 ऑगस्ट- पाकिस्तान विरुद्ध नेपाल, मुल्तान, दु. 3 वा (साखळी फेरी)
31 ऑगस्ट- बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका, कँडी, दु. 3 वा (साखळी फेरी)
2 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध भारत, कँडी, दु. 3 वा (साखळी फेरी)
3 सप्टेंबर- बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर, दु. 3 वा (साखळी फेरी)
4 सप्टेंबर- भारत विरुद्ध नेपाल, कँडी, दु. 3 वा (साखळी फेरी)
5 सप्टेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, लाहोर, दु. 3 वा (साखळी फेरी)
6 सप्टेंबर- ए1 विरुद्ध बी2, लाहोर, दु. 3:00 वा (सुपर 4)
9 सप्टेंबर- बी1 विरुद्ध बी2, कोलंबो, दु. 3:00 वा (सुपर 4)
10 सप्टेंबर- ए1 विरुद्ध ए2, कोलंबो, दु. 3:00 वा (सुपर 4)
12 सप्टेंबर- ए2 विरुद्ध बी1, कोलंबो, दु. 3:00 वा (सुपर 4)
14 सप्टेंबर- ए1 विरुद्ध बी1, कोलंबो, दु. 3:00 वा (सुपर 4)
15 सप्टेंबर- ए2 विरुद्ध बी2, कोलंबो, दु. 3:00 वा (सुपर 4)
17 सप्टेंबर- अंतिम सामना, कोलंबो, दु. 3:00 वा (सुपर 4) (big news asia cup 2023 all match timing revealed know here all details here)
महत्त्वाच्या बातम्या-
पॅट कमिन्सबाबत धक्कादायक बातमी! विश्वचषकापूर्वी कांगारुंचं टेन्शन वाढलं, लगेच वाचा
विराट आणि रोहितमध्ये सर्वोत्तम कोण? विंडीजच्या स्टार खेळाडूने क्षणाचाही विलंब न करता सांगितले उत्तर